>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
पुरुषाला वैवाहिक सुख हे शुक्रावरून पहिले जाते, तर स्त्रीसाठी मंगळ आणि गुरु महत्वाचे आहेत. शुक्र-शनी युती असेल तर अनैकता होताना दिसत नाही. स्वतःवर संयम असतो. स्त्री पत्रिकेत मंगळावर गुरूची दृष्टी असेल, तर सहसा चारित्र चांगले असते. पुरुषाच्या पत्रिकेत मंगळ शुक्र युती ही मैत्रीसाठी हात पुढे करायला थोडे धाडस देते. मंगळ शुक्र युती असेल तर कामवासना अधिक असू शकते. बुध हा थोडा नपुंसकतेकडे नेणारा आहे. बुध हा पैशाचा ग्रह आहे. शुक्र राहूची युती पैशाला सर्वस्व मानणारी असते. हा भोग भोगवणारा तर शुक्र राहू हा निरस. शुक्र चांगला असतो त्या स्त्रीच्या अंगावर हिऱ्याचे दागिने असतात. अन्न ,वस्त्र निवारा आणि बुटी पार्लर ह्या तिच्या मुख्य गरजा असतात.
स्त्रीच्या पत्रिकेत शुक्र शनी युती छानछोकीची आवड देणार नाही. समाजातील उच्च वर्तुळातील स्त्रिया बघा. शुक्र राहू फॅशन करणारे असतात . शुक्र रवी असेल तर नवरा कमावणारा असतो आणि त्याच्या पदामुळे तिला मान मिळतो. गुरु शुक्र पुरुषांच्या पत्रिकेत जितका वाईट जातो तितका स्त्री च्या पत्रिकेत जात नाही. स्त्रीचे वैवाहिक जीवन हे मुख्यत्वे मंगळावर अवलंबून असते. गुरूमुळे वैवाहिक सुख तर मंगळामुळे जोडीदार समजतो. स्त्रीच्या पत्रिकेत मंगळ हा सप्तमेश किंवा गुरूच्या दृष्टीत असेल तर वैवाहिक सौख्यात हानी होताना दिसते. मंगळ ज्या स्थानात असतो त्या स्थानापासून दर्शवलेल्या नातेसंबंधपासून कटकटी, भांडणे वितुष्ट येते.
अग्नितत्वाच्या राशीत मंगळ असेल तर स्फोटकता अधिक असेल. पृथ्वितत्वाच्या राशीत असेल तर चांगली फळे देईल. वायुतत्वाच्या राशीतील मंगळ हा वणवा पेटल्यासारखा असतो. पंचमावर मंगळाची दृष्टी असेल तर पाळीचा त्रास ,गर्भाशयाची सर्जरी होते. मंगळ लाभात असेल तर मित्रांमध्ये भांडणे होतात. लग्नात असेल तर व्यक्तिमत्व स्फोटक असते, सतत चिडणे रागावणे होते. धनस्थानातील मंगळ हा घरात अशांतता, स्फोटक वातावरण ठेवतो. तृतीय स्थानातील मंगळ शेजारी, भावंडे ह्यांच्यात दुरावा निर्माण करतो. चतुर्थातील मंगळ आईशी दुरावा वितुष्ट निर्माण करतो. पंचमातील मंगळ खेळासाठी उत्तम पण अशा लोकांच्या नावावर काहीही करू नये. जल तत्वातील मंगळ त्यामानाने सौम्य असतो. पंचम स्थानातील मंगळ गर्भपात देतो. संततीशी मतभेत असतात. पंचमाशी मंगळाचा संबंध असेल आणि प्रथम संतती मुलगी असेल तर त्रासदायक नसतो. षष्ठात मंगळ शत्रूवर मात करतो.
सप्तमातील मंगळ तू तू मै मै करवतो. अष्टम स्थानात मंगळ असेल तर तो अपघात दर्शवतो, आयुष्याला घातक असतो. ह्या मंगळाची दृष्टी ही धनस्थानावर असते त्यामुळे स्वतःचे आणि जोडीदाराचे आयुष्य घोक्यात असते. अष्टम स्थानातील मंगळ हा मोठ्या शस्त्रक्रिया साठी कारणीभूत ठरतो. मंगळावर गुरूची दृष्टी असणे हे उत्तम, पण गुरुवर मंगळाची दृष्टी असणे हे वाईट! एखाद्या पत्रिकेत मंगळ सप्तम स्थानाशी निगडीत असेल तर शनी त्या दुसऱ्या पत्रिकेत कुठल्याही प्रकारे सप्तम स्थानाशी निगडीत नको. मंगळ केतू , शुक्र केतू हे वाईट.
मंगळावर शनीची दृष्टी असेल तर एखाद्या वस्तूचे जेव्हा गतीत रुपांतर होते, तेव्हा ती मंगळाच्या अधिपत्याखाली येते. मंगळ प्रधान व्यक्ती ही तापट, लवकर संतप्त होणारी, नमते न घेणारी, कोमलपणा नसून अहंकार आणि उतावीळ, दुसऱ्यावर अधिकार गाजवण्याचा स्वभाव असतो. पत्रिकेत मंगळ आहे पण तो खरच त्रासदायक आहे का, हा विचार केला पाहिजे. मंगळ का कर्क राशीत, बुधाच्या राशीत असेल, अस्तंगत असेल तर अशुभत्व कमी होते. प्रथम स्थानात मेषेचा, चतुर्थात कर्केचा, सप्तम स्थानात मकरेचा, अष्टमात सिंहेचा आणि व्यय स्थानात धनु राशीचा मंगळ असेल तर अशुभ नाही. मंगळ वक्री असेल तर तो मंगळ सौम्य होतो.
मंगळ पत्रिकेत कुठेही असून लग्नेश सप्तमेश ह्यापैकी कठल्याही ग्रहावर दृष्टी टाकत असेल तर पती आणि पत्नी मध्ये वाद होतात .चंद्र आणि शुक्र युतीवर मंगळाची दृष्टी असेल तर पती आणि पत्नी मध्ये खटके उडतात. मंगळाची उपासना करायची असेल तर उत्तम म्हणजे गणपती स्तोत्र आणि मंगळाचा जप करणे. हनुमान चालीसा, सुंदरकांडाचा पाठ म्हणणे. श्रीसूक्त, देवी अथर्वशीर्ष, गणपती अथर्वशीर्ष आवर्तने, ऋणमोचक अंगारक स्तोत्र, मंगळ चंडिका स्तोत्र म्हणणे. मंगल हा अग्नितत्वाचा ग्रह आहे. त्यामुळे योग , प्राणायाम करून मुळात आपण आपला स्वभाव शांत करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.
Tripuri Purnima 2025: दिवाळीनंतर येणारी त्रिपुरी पौर्णिमा का महत्त्वाची? कशी करावी शिवउपासना?
मंगळ सदैव अमंगळ करेल असे गृहीत धरून चांगल्या पत्रिका डावलू नका, कदाचित तीच मुलगी तुमच्या मुलाचा संसार सुखाचा करणारी असेल.....सहमत ?
संपर्क : 8104639230
Web Summary : Mars in a birth chart impacts marriage, relationships, and temperament. Its placement and aspects influence personality, potential conflicts, and well-being. Remedies include mantra chanting and lifestyle adjustments for a peaceful life.
Web Summary : जन्म कुंडली में मंगल विवाह, रिश्तों और स्वभाव को प्रभावित करता है। इसकी स्थिति व्यक्तित्व, संभावित संघर्षों और कल्याण को प्रभावित करती है। शांतिपूर्ण जीवन के लिए मंत्र जाप और जीवनशैली में बदलाव उपाय हैं।