Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2025 16:05 IST2025-08-20T16:02:22+5:302025-08-20T16:05:25+5:30
Astro Tips: आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडाव्या म्हणून ज्योतिष शास्त्रात काही सोपे उपाय दिले आहेत, जे श्रद्धेने केले असता लाभ होतो असा भाविकांचा अनुभव आहे.

Astro Tips: हा हळदीचा ट्रेंड नाही तर आयुष्यातील नकारात्मकता घालवण्यासाठी आहे गुरुवारचा उपाय!
आपले काम, कष्ट, प्रयत्न करण्याची तयारी आणि नशिबाची साथ या सगळ्या गोष्टी यशस्वी होण्यासाठी महत्त्वाच्या असतात. काम करण्याची तयारी आहे पण नशिबाची साथ नाही आणि नशिबाची साथ आहे पण काम करण्याची तयारी नाही, असे असेल तर तुम्ही कधीच यशस्वी होऊ शकत नाही. यापैकी प्रयत्न करणे आपल्या हाती आहे आणि नशिबाचे फासे आपल्या बाजून पडावे यासाठी ज्योतिष शास्त्रात उपाय दिले आहेत, ते श्रद्धेने केले असता फळ मिळते असा भाविकांचा अनुभव आहे.
सद्यस्थितीत नकारात्मक ऊर्जेचे वलय आपल्या सभोवताली जाणवते. लोक नकारात्मक बोलतात, नकारात्मक बातम्या नजरेस पडतात, दुसऱ्यांबद्दल नकारात्मक विचार करतात, अशा लोकांमध्ये उठबस केल्याने आपणही त्या नकारात्मक ऊर्जेचा एक भाग होतो. त्यामुळे आपल्याही मनात वाईट विचार येणे, नकारात्मक विचार येणे स्वाभाविक आहे. याचा परिणाम आपल्या कामावर आणि प्रगतीवरदेखील होतो आणि होणारी कामे थांबतात, अडतात. यातून बाहेर पडण्याचा मार्ग म्हणजे आपल्या गुरूंचे, स्वामी समर्थांचे, ईश्वराचे नामस्मरण आणि पुढील ज्योतिष शास्त्रीय उपाय, ज्याच्या साहाय्याने तुम्हाला आयुष्याला नवीन दिशा देता येते. गुरुबळ वाढते आणि प्रगती होते.
ज्योतिष अभ्यासक शिरीष कुलकर्णी याबाबत गुरुवारचा एक उपाय सांगतात. ते म्हणतात, 'ज्यांना आपल्या व्यक्तिमत्त्वाभोवती सकारात्मक, अध्यात्मिक वलय तयार करायचे आहे त्यांनी दर गुरुवारपासून दिलेला उपाय सुरु करावा.
लाल पिवळा धागा: बाजारात मिळणारा पूजेचा लाल पिवळा धागा गुरूंचे स्मरण करून पुरुषांनी उजव्या आणि स्त्रियांनी डाव्या मनगटाला बांधावा. धागा बदलायचा असेल तर तो गुरुवारीच बदलावा. त्याला रक्षाधागा म्हणतात.
हळदीचा उपाय : दुसरा उपाय म्हणजे दर गुरुवारी आपल्या आंघोळीच्या पाण्यात दोन चमचे हळद घालावी आणि गुरूंचे स्मरण करत स्नान करावे. असे केल्याने नकारात्मक शक्तीचा प्रभाव कमी होऊन आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडू लागतात.
इच्छित मनोकामनापूर्तीसाठी हा उपाय सलग सहा महिने करावा, तोही श्रद्धेने करावा, त्याची अनुभूती येत्या काळात मिळू लागते. पहा व्हिडीओ