Astro tips: २०२५ मध्ये मनासारख्या गोष्टी घडाव्यात म्हणून मंगळवारपासून सुरु करा 'हा' उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 14:50 IST2024-12-27T14:48:24+5:302024-12-27T14:50:16+5:30
New Year 2025: २०२५ या वर्षाची देवता असणार आहे हनुमान; संपूर्ण वर्षं चांगलं जाण्यासाठी ज्योतिष शास्त्राने सांगितलेला उपाय येईल कामी!

Astro tips: २०२५ मध्ये मनासारख्या गोष्टी घडाव्यात म्हणून मंगळवारपासून सुरु करा 'हा' उपाय!
पाहता पाहता वर्ष समाप्तीच्या उम्बरठ्यावर येऊन उभे राहिलो. नवीन वर्षाकडे आशेने पाहताना, गत वर्षात काय गमावले याचीही यादिडोळ्यासमोरून जाते. निदान आगामी वर्ष तरी गमावण्याचे नाही तर कमावण्याचे असावे असे आपल्याला वाटणे स्वाभाविक आहे. त्यासाठी प्रयत्नांना उपासनेची गरज लागणार आहे. ती कशी करावी जाणून घेऊ आणि उपासनेत सातत्य ठेवून इच्छित मनोकामना पूर्ण करू.
मंगळवार हा जसा गणपतीचा वार तसाच हनुमंताचा वारदेखील समजला जातो. २०२४ ची सांगता मंगळवारी होणार असून १ जानेवारी २०२५ चा पहिला दिवस बुधवारी येत आहे. तिथून पुढे पूर्ण वर्ष आनंदात जावे असे वाटत असेल तर हनुमंताची उपासना करा, असे ज्योतिष तज्ज्ञांनी सुचवले आहे. त्याबरोबरीनेच सांगितला आहे एक सोपा पण महत्त्वाचा उपाय!
ज्योतिष तज्ज्ञ सांगतात, सुरुवात होण्यापूर्वी शेवट कुठे झाला हे पाहणेही महत्त्वाचे असते. २०२४ चा शेवट मंगळवारी होत असल्याने आगामी वर्षावर बजरंगबलीचे स्वामित्त्व असणार आहे. त्याच्या आशीर्वादाने पुढील वर्षात अनेक गोष्टी आपल्या मनासारख्या घडाव्यात म्हणून पुढील उपाय करा-
>> मधाची छोटीशी बाटली घ्या. मंगळवारी हनुमंताच्या दर्शनाला जा.
>> हनुमंताचे दर्शन घ्या. मधाची बाटली तुमच्या जवळ ठेवा.
>> शांत चित्ताने हनुमान चालीसा म्हणा.
>> हनुमंताला नमस्कार करा आणि मधाची बाटली अर्पण करा.
>> सलग २१ मंगळवार हा प्रयोग यशस्वीपणे पार पाडलात, तर आगामी वर्ष २०२५ तुमच्यासाठी अविस्मरणीय ठरेल.
उपाय सोपा वाटत असला, तरी सातत्य हा त्यातला मुख्य धागा आहे. तुमच्या प्रयत्नाना या उपासनेची जोड द्या, लाभ होईल!