Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 13:06 IST2025-07-04T13:06:15+5:302025-07-04T13:06:43+5:30

Astro Tips: शुक्रवार लक्ष्मीचा आणि ती प्रसन्न व्हावी, तुमची श्रीमंती वाढावी, म्हणून ज्योतिष शास्त्रात दिलेला उपाय तुमच्या पथ्थ्यावर पडतो का बघा!

Astro Tips: Mogra's Gajra and loved ones, do 'this' remedy on Friday, increase the wealth of the house! | Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!

Astro Tips: मोगऱ्याचा गजरा आणि प्रिय व्यक्ती, शुक्रवारी करा 'हा' उपाय, वाढवा घरची श्रीमंती!

गाडी, बंगला, जमीन, संपत्ती याने आयुष्य परिपूर्ण असावे असे प्रत्येक सांसारिक व्यक्तीचे स्वप्न असते. त्यासाठी तो आयुष्यभर मेहनतही घेतो. मेहनतीला दैवाची साथ लाभली तर सगळी स्वप्नं साकारही होतात. कोणाची लवकर तर कोणाची उशिरा! पण योग्य वेळेत योग्य गोष्टी हाती लागल्या तर त्या उभोगण्यात वेगळी मजा असते. वय निघून गेल्यावर मिळालेले सुख आनंद देते पण उपभोगता येत नाही. त्यामुळे वेळ आणि वय यांचे गुणोत्तर बसावे यासाठी ज्योतिष शास्त्रात एक छोटासा उपाय दिला आहे. 

ज्योतिष तथा वास्तुशास्त्राचे अभ्यासक मकरंद सरदेशमुख सांगतात, 'शुक्र हा भौतिक सुख देणारा ग्रह आहे. पती पत्नीच्या आयुष्यात ते दोघे परस्परांचे शुक्र असतात. ते जर एकमेकांच्या सहवासात खुश असतील, समाधानी असतील तर आपसुख दोघांचा शुक्र प्रबळ होईल आणि त्यांच्या आयुष्यात हळू हळू बरकत होत ते श्रीमंत होतील. 

यासाठी प्रत्येक व्यक्तीने शुक्रवारी आपल्या पत्नीला संध्याकाळी मोगऱ्याचा गजरा द्यायचा आहे. गजरा देणे हे प्रेम व्यक्त करण्याचे माध्यम आहे. हा सुगंध नात्यात दरवळावा यासाठी हा उपाय सुचवला आहे. मात्र मोगरा हा वसंत ऋतूमध्येच मिळतो. अन्य ऋतूमध्ये काय द्यावे, याचा विचार करत असाल तर बारमाही मिळणारा गुलाबदेखील तुम्ही तुमच्या पत्नीला देऊ शकता. 

हा उपाय साधा वाटत असला तरी मानस शास्त्राच्या दृष्टिकोनातून पाहिले तर त्यामागचा तर्क लक्षात येईल. पती पत्नीच्या नात्यात वादविवाद होत असतात. माघार कोणी घ्यावी हा मुद्दा असतो. अशा वेळी ही सुगंधी भेट न बोलता प्रेम व्यक्त करण्याचे सुंदर माध्यम आहे. भांडणाला पूर्णविराम मिळतो आणि नाते परत फुलासारखे बहरते. म्हणून हा उपाय सुचवला असावा. 

फारसा खर्चिक नसलेला हा उपाय तुम्हीही आजपासून सुरु करा आणि श्रीमंतीचा मार्ग स्वतःसाठी मोकळा करा. सविस्तर व्हिडीओ बघा -


Web Title: Astro Tips: Mogra's Gajra and loved ones, do 'this' remedy on Friday, increase the wealth of the house!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.