>> अस्मिता दीक्षित, ज्योतिष अभ्यासक
अनेकदा प्रयत्न करूनही घराच्या विक्रीत अडचणी येतात. वास्तू किंवा प्लॉट विकला जात नाही. अशावेळी खालील रामबाण उपाय करून पहा, हा उपाय फळतो असा अनेकांचा अनुभव आहे.
शुक्र गोचर २०२५: शुक्रादित्य राजयोग; 'या' ६ राशी हात लावतील तिथे सोनं करतील!
वास्तू तथा जमीन विक्रीसाठी उपाय(Astro tips to sell house or plot) :
शनिवारी संध्याकाळी दिवे लागणी नंतर घरातील पुरुषाने हा उपाय करायचा आहे. पहिल्या शनिवारी जो करेल त्यानेच दर शनिवारी हा उपाय करायचा आहे. एक कोरफडीचे पान एका मोठ्या कागदावर ठेवून त्यास हळद कुंकू वाहून आपल्याला जे घर विकायचे आहे, ते डोळ्यासमोर आणावे आणि ते चांगल्या किमतीला विकले जावे अशी वास्तुपुरुषास मनापासून तळमळीने प्रार्थना करावी. दही भाताचा नेवैद्य दाखवून दीप लावून उदबत्ती ओवाळून कोरफडीची पूजा करावी. पूजा करून खालील २ मंत्र प्रत्येकी ११ वेळा म्हणावेत
ओं चैतन्य वास्तुपुरुषाय नमः |ओं चैतन्य स्थलपुरुषाय नमः |
रात्रभर पूजा केलेल्या सर्व गोष्टी तिथेच ठेवाव्यात आणि सकाळी सर्व गोष्टी एका पिशवीत घालून दूरवर असलेल्या उकीरड्यावर किंवा कचरा कुंडीत नेऊन टाकाव्यात. घरी आल्यावर हातपाय धुवून कामाला लागावे. साधारण प्रत्येकाच्या प्रारब्धाप्रमाणे कालावधी लागतो. मात्र जागा विकली जाते हे नक्की. आपल्याला फळ कधी द्यायचे ते आपण ज्याची पूजा करतो ती देवता ठरवते. आपण धीर धरावा, घाई करू नये. अडचण आल्यास पुढील शनिवारी उपाय करावा. घराची किंवा प्लॉट ची विक्री करून सौदा पूर्ण होत नाही त्या दिवसापर्यंत दर शनिवारी हा उपाय सद्भावनेने करत राहावा.
Sade Sati Upay: एकच रास, तरी साडेसातीचा काळ प्रत्येकाचा वेगळा; ३ महिन्यापूर्वी लागते चाहूल!
सद्भावना आणि तळमळ महत्वाची आहे. कुठलाही उपाय मनापासून श्रद्धेने केला तर नक्कीच फळ मिळते. अनेकांनी हा उपाय केलेला आहे आणि त्याचे फळ मिळालेले आहे. करून बघा . सर्व स्पष्ट लिहिलेले आहे त्यामुळे पाळी आली तर ? बाहेरगावी गेलो तर ? सुतक लागले तर ? असले प्रश्न विचारायला फोन करू नये ही विनंती.
संपर्क : 8104639220