Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2025 17:42 IST2025-06-06T17:41:58+5:302025-06-06T17:42:38+5:30

Astro Tips: दान करण्यासारख्या असंख्य वस्तू असतानाही शनिवारी मारुतीच्या मंदिरात काडेपेटीचे दान का केले जाते, जाणून घ्या. 

Astro Tips: According to astrology, why is matchbox donation done secretly in Hanuman temple on Saturdays? | Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे का केले जाते काडेपेटीचे दान? 

हिंदू धर्मात दानधर्माला अत्यंत महत्त्व आहे. दान हा शब्द धर्माला जोडून असल्यामुळे दान केल्यामुळे आपोआप धर्मपालन होते अशी त्यामागे धारणा आहे. मनुष्याने केवळ स्वतःचा विचार न करता इतरांचाही विचार करावा आणि केवळ मदतीची अपेक्षा न करता इतरांच्या मदतीसाठी हात पुढे करावा, मग ती मदत कोणत्याही प्रकारची असू शकते. हे दानाचे महत्त्व रुजावे म्हणून सण वाराला दान करा असे सांगितले जाते. मात्र शनिवारी हनुमान मंदिरात काडेपेटी दान करण्यामागे काय कारण ते जाणून घेऊ. 

ज्योतिषशास्त्रानुसार हनुमान मंदिरात काडेपेटी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक बदल होऊ लागतात आणि अनेक समस्या दूर होऊ शकतात. कारण काडेपेटीचा अग्नीशी संबंध आहे, जे शुद्धीकरण आणि पवित्रतेचे प्रतीक आहे. काडेपेटी दान केल्याने व्यक्तीच्या जीवनातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अग्नी हा घटक मंगळाशी संबंधित आहे. हनुमान आणि मंगळ यांचाही निकटचा संबंध आहे. मंगळाला संतुष्ट करण्यासाठी हनुमानाचे आशीर्वाद मिळावे यासाठी काडेपेटीचे दान करून हनुमानाच्या मार्गे अग्नीने मंगळाला संतुष्ट केले जाते. 

असे मानले जाते की जेव्हा राहू-केतू किंवा शनि कुंडलीत प्रतिकूल परिस्थितीत असतात तेव्हा हा उपाय मन आणि वातावरणातील भीती, वाईट स्वप्ने आणि मानसिक अशांतता दूर करतो. इतकेच नाही तर मंगळ दोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना वैवाहिक जीवनात समस्या, मालमत्तेचे वाद आणि नैराश्याचे प्रसंग असतील तर तेही या उपायाने दूर होतात.  मंदिरात गुप्तपणे काडेपेटी दान केल्याने व्यक्तीला मानसिक शक्ती, धैर्य आणि स्थिरता जाणवते.

एवढेच नाही तर जर एखाद्याला कामाच्या ठिकाणी आदर मिळत नसेल, एखाद्याची पदोन्नती काही कारणास्तव थांबली असेल किंवा इच्छित ठिकाणी बदली होत नसेल, तर मंगळवारी किंवा शनिवारी हनुमान मंदिरात गुप्तपणे काडीपेट्यांचे दान करणे फायदेशीर ठरू शकते. कुंडलीत दहावे घर किंवा मंगळ-शनीचा संबंध प्रतिकूल असल्यास हा उपाय विशेषतः प्रभावी आहे.

पण गुप्त दान का?

दान हे नेहमी गुप्तच करावे. असे म्हणतात की दान केलेले या हाताचे त्या हाताला कळता कामा नये एवढे ते गुप्तपणे केले पाहिजे. याउलट आपण दानपेटीत १ रुपायाचे नाणे टाकतानाही गाजावाजा करतो. नोट टाकताना आजू बाजूला कोण पाहतेय की नाही याची खात्री करतो. बाक, पंखे, ट्यूबलाईट, सतरंजी दान करताना त्यावर आपले नाव लिहून देतो. या दानाला दान कसे म्हणता येईल? दान म्हणजे एखाद्या वस्तूवरील आपला हक्क सोडणे म्हणजे दान. जेव्हा त्यावर आपण नाव लिहितो तेव्हा आपण आपला हक्क ठेवतो. तसे दान ग्राह्य धरले जात नाही. म्हणून ते नेहमी गुप्तपणेच केले पाहिजे असे शास्त्र सांगते. 

हा उपाय कधी करावा?

शुभ दिवस : हा उपाय करण्यासाठी सर्वोत्तम दिवस म्हणजे मंगळवार किंवा शनिवार. जर तुम्ही या दिवशी हा उपाय केला तर तुमच्या जीवनात खूप शुभ परिणाम होऊ शकतात.

शुभ स्थान: हा उपाय करण्यासाठी, कोणत्याही हनुमान मंदिरात जा आणि तेथे गुप्तपणे काडेपेटी दान करा. 

संकल्प: ही भावना मनात ठेवा - 'हे पवनपुत्र हनुमान, माझ्या जीवनातील अंधाराला प्रकाशात बदला. कृपया माझे अडथळे दूर करा.' आणि काडेपेटी ठेवून संकल्पपूर्ती करा!

( सदर माहिती सामान्य गृहीतके आणि ज्योतिषीय मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.)

Web Title: Astro Tips: According to astrology, why is matchbox donation done secretly in Hanuman temple on Saturdays?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.