Astro Tip: शुक्रवार विशेष: लक्ष्मीपूजेसोबतच 'अशी' करा कुबेर साधना; पैसा टिकेलही आणि दुप्पट वेगाने वाढेलही!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2026 07:05 IST2026-04-10T07:01:01+5:302026-04-10T07:05:02+5:30
Astro Tips: दर शुक्रवारी लक्ष्मीपूजनासोबतच करा कुबेर साधना. जाणून घ्या कुबेर महाराजांची मूर्ती कोणत्या दिशेला ठेवावी आणि धनप्राप्तीचा प्रभावी मंत्र.

Astro Tip: शुक्रवार विशेष: लक्ष्मीपूजेसोबतच 'अशी' करा कुबेर साधना; पैसा टिकेलही आणि दुप्पट वेगाने वाढेलही!
शुक्रवार हा माता लक्ष्मीचा वार मानला जातो, पण शास्त्रात लक्ष्मीपूजनासोबतच 'कुबेर' पूजनालाही अनन्यसाधारण महत्त्व दिले आहे. आपण म्हणतो की, "सगळी सोंगं घेता येतात, पण पैशांचं सोंग घेता येत नाही." संसारी जीवनात पावलोपावली पैशाची गरज भासते. पण पैसा केवळ येऊन चालत नाही, तर तो योग्य मार्गाने येणे आणि घरात टिकणेही तितकेच महत्त्वाचे असते.
हे ही वाचा: Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
संत तुकाराम महाराज म्हणतात, 'जोडोनिया धन उत्तम व्यवहारे'—अर्थात कष्टाने आणि चांगल्या मार्गाने धनसंचय करावा. जर तुमच्याकडे पैसा येतो पण तो टिकत नसेल किंवा उत्पन्नाची साधने वाढत नसतील, तर ज्योतिष शास्त्राने सांगितलेला कुबेर महाराजांचा हा 'खास' तोडगा तुम्हाला निश्चितच लाभ देईल.
धनाची देवता कुबेर महाराज हे अत्यंत कल्याणकारी मानले जातात. घरातील आर्थिक चणचण दूर करण्यासाठी कुबेर महाराजांची प्रतिमा किंवा मूर्ती घरामध्ये असणे अत्यंत शुभ ठरते. पण, वास्तुशास्त्रानुसार ती कोणत्या दिशेला असावी, याचे काही विशेष नियम आहेत.
१. पैसा साठवण्यासाठी: उत्तर दिशा (Savings & Stability)
कुबेर महाराज हे उत्तर दिशेचे स्वामी आहेत. जर तुम्हाला असे वाटत असेल की घरात पैसा येतो पण तो विनाकारण खर्च होतो, पाण्याचा ओघ असल्यासारखा निघून जातो, तर कुबेर महाराजांची प्रतिमा घराच्या उत्तर दिशेला लावा. यामुळे पैशांचा अपव्यय थांबतो आणि घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते.
२. उत्पन्न वाढवण्यासाठी: पश्चिम दिशा (Multiplication & Growth)
जर तुम्हाला तुमची आवक वाढवायची असेल, नोकरी-व्यवसायात प्रगती हवी असेल, तर कुबेर महाराजांची मूर्ती किंवा प्रतिमा पश्चिम दिशेला लावा. वास्तूमध्ये पश्चिम दिशा ही कोणत्याही गोष्टीला 'द्विगुणित' (Double) करणारी मानली जाते. येथे कुबेर महाराजांचे पूजन केल्यास उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात आणि संपत्तीत दुप्पट वाढ होते.
महत्त्वाची टीप: पश्चिम दिशेला उभे असताना कधीही नकारात्मक विचार करू नका, कारण ही दिशा विचारांनाही दुप्पट करते. त्यामुळे या दिशेला कायम सकारात्मक आणि समृद्धीचे विचार ठेवावेत.
हे ही वाचा : Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
कुबेर मंत्र आणि संध्याकाळची साधना (Mantra & Ritual)
आर्थिक अडचणींच्या चक्रातून बाहेर पडण्यासाठी दररोज संध्याकाळी कुबेर महाराजांच्या मंत्राचा जप करणे लाभदायक ठरते.
साधना विधी:
सायंकाळी हात-पाय स्वच्छ धुवून किंवा आंघोळ करून पवित्र व्हावे.
कुबेर महाराजांच्या प्रतिमेसमोर शुद्ध तुपाचा दिवा आणि उदबत्ती लावावी.
जपमाळ घेऊन खालील मंत्राचा श्रद्धेने १०८ वेळा जप करावा:
ॐ श्रीं ह्रीं क्लीं श्रीं क्लीं वित्तेश्वराय नमः॥