शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

Sankashti Chaturthi Vrat October 2021: अश्विन संकष्ट चतुर्थी: व्रताचरणाची सोपी पद्धत; पाहा, शुभ मुहूर्त, योग आणि चंद्रोदय वेळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2021 5:39 PM

Ashwin Sankashti Chaturthi October 2021: अश्विन संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची पद्धत शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

गणेश उपासकांसाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत हे विशेष असते. हजारो भाविक दर महिन्याला येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला मनोभावे गणपती बाप्पाचे पूजन, उपवास, नामस्मरण करत असतात. आपल्या संस्कृतीत आचरल्या जाणाऱ्या व्रतांना वैज्ञानिक आणि शास्त्रीयदृष्ट्या यांना अनन्य महत्त्व असते. आताच्या घडीला चातुर्मास सुरू आहे. नवरात्रोत्सव दसरा झाल्यानंतर येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले जाते. याला करक चतुर्थी असेही म्हटले आहे. या संकष्ट चतुर्थीची व्रताचरणाची पद्धत शुभ योग आणि विविध शहरांमधील चंद्रोदय वेळ जाणून घ्या...

अश्विन संकष्ट चतुर्थी: २४ ऑक्टोबर २०२१

अश्विन वद्य चतुर्थी प्रारंभ: २३ ऑक्टोबर २०२१ रोजी मध्यरात्री ०३ वाजून ०१ मिनिट.

अश्विन वद्य चतुर्थी समाप्ती: २५ ऑक्टोबर २०२१ रोजी पहाटे ०५ वाजून ४३ मिनिटे.

भारतीय पंचांगानुसार, सूर्योदयाची तिथी मानण्याची परंपरा आहे. असे असले, तरी संकष्ट चतुर्थी व्रत प्रदोष काळी केले जाते. तसेच यामध्ये चंद्रोदय आणि चंद्रदर्शन महत्त्वाचे असल्यामुळे श्रावण महिन्यातील संकष्ट चतुर्थीचे व्रताचरण आणि पूजन रविवार, २४ ऑक्टोबर २०२१ रोजी करावे, असे सांगितले जाते. अश्विन महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला करक चतुर्थी असेही संबोधले जाते. या दिवशी उत्तर भारतात करवा चौथ हे व्रत मोठ्या भक्तिभावाने आचरले जाते. 

संकष्ट चतुर्थीच्या व्रताचरणाची सोपी पद्धत

संकष्ट चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नानादी कार्य उरकून घ्यावीत. दिवसभर उपवास करावा. गणपती बाप्पाची षोडशोपचार पूजा करावी. शुद्ध पाण्याने गणपतीच्या मूर्तीचा अभिषेक करावा. अभिषेक करते वेळी अथर्वशीर्ष पाठ असल्यास २१ वेळा आवर्तन करावे, अन्यथा 'ॐ गं गणपतये नम:' या मंत्राचा १०८ वेळा जप करावा. धूप, दीप, नेवैद्य अर्पण करून गणेशाचे नामस्मरण करावे. प्रसाद ग्रहण करून त्याचे वाटप करावे. यानंतर रात्री चंद्रोदयाची वेळ पाहावी. धूप, दीप लावून गणपती बाप्पाला नैवेद्य दाखवावा. चंद्रदर्शन घेऊन चंद्राला अर्घ्य  द्यावे आणि गणपतीची आरती म्हणून जास्वंदाची फुले आणि दूर्वा वाहून उपवास सोडावा. अश्विन महिन्यातील संकष्ट चतुर्थी नवरात्रोत्सवानंतर आणि दिवाळीच्या आधी येत असल्याने याला अधिक महत्त्व प्राप्त होते, असे म्हटले जाते. या दिवशी चंद्र वृषभ राशीत असून, याच राशीत राहुदेखील विराजमान आहे. 

विविध शहरांतील चंद्रोदय वेळ

शहरांची नावेचंद्रोदयाची वेळ
मुंबईरात्रौ ०८ वाजून ४५ मिनिटे
ठाणेरात्रौ ०८ वाजून ४३ मिनिटे
पुणेरात्रौ ०८ वाजून ४१ मिनिटे
रत्नागिरीरात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे
कोल्हापूररात्रौ ०८ वाजून ४४ मिनिट
सातारारात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे
नाशिकरात्रौ ०८ वाजून ३८ मिनिटे
अहमदनगररात्रौ ०८ वाजून ३६ मिनिटे
धुळेरात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
जळगावरात्रौ ०८ वाजून २९ मिनिट
वर्धारात्रौ ०८ वाजून १७ मिनिटे
यवतमाळरात्रौ ०८ वाजून २० मिनिटे
बीडरात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
सांगलीरात्रौ ०८ वाजून ४२ मिनिटे
सावंतवाडीरात्रौ ०८ वाजून ४७ मिनिटे
सोलापूररात्रौ ०८ वाजून ३५ मिनिटे
नागपूररात्रौ ०८ वाजून १४ मिनिटे
अमरावतीरात्रौ ०८ वाजून २० मिनिटे
अकोलारात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे
औरंगाबादरात्रौ ०८ वाजून ३२ मिनिटे
भुसावळरात्रौ ०८ वाजता २८ मिनिटे
परभणीरात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
नांदेडरात्रौ ०८ वाजून २५ मिनिटे
उस्मानाबादरात्रौ ०८ वाजून ३३ मिनिटे
भंडारारात्रौ ०८ वाजून १२ मिनिटे
चंद्रपूररात्रौ ०८ वाजून १६ मिनिटे
बुलढाणारात्रौ ०८ वाजून २८ मिनिटे
मालवणरात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
पणजीरात्रौ ०८ वाजून ४८ मिनिटे
बेळगावरात्रौ ०८ वाजून ४४ मिनिटे 
इंदौररात्रौ ०८ वाजून २४ मिनिटे
ग्वाल्हेररात्रौ ०८ वाजून ०७ मिनिटे

 

टॅग्स :Sankashti Chaturthiसंकष्ट चतुर्थी