शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक प्रक्रियेत मोठा घोटाळा! 'या' पाच प्रकारे झाली ‘मतांची चोरी’, राहुल गांधींचा दावा; विचारले असे प्रश्न
2
आजचे राशीभविष्य, ०८ ऑगस्ट २०२५: पद-पैसा-प्रतिष्ठा वाढ, सुख-सुबत्ता, कल्याणाचा दिवस
3
रेव्ह पार्टीत नशा देऊन महिलांवर लैंगिक अत्याचार, प्रांजल खेवलकर अडचणीत; मोबाइलमध्ये सापडला अश्लील छायाचित्रांचा साठा!
4
मला व्यक्तिश: खूप मोठी किंमत चुकवावी लागणार आहे, नेमकं काय म्हणाले मोदी?
5
कबुतरखान्यात दाणे टाकण्यावर हायकोर्टाची बंदी कायम, हटविण्यास उच्च न्यायालयाचा नकार
6
न्या. वर्मा यांचे वर्तन विश्वासार्ह नाही; महाभियोगाची शिफारस रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार 
7
Isro Dharali Photos: गाव नाही, भगीरथी नदीही गिळली; बघा ISROच्या सॅटेलाईटने टिपलेले फोटो, किती झालाय विध्वंस
8
डोनाल्ड ट्रम्प यांचा भारतावर टॅरिफ बॉम्ब! चीनने चढवला हल्ला; म्हणाला, 'हा टॅरिफचा दुरुपयोग'
9
Kenya Plane Crash: घरांवरच कोसळले वैद्यकीय पथकाला घेऊन जाणारे विमान; २ डॉक्टरसह ६ जण ठार
10
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
11
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
12
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
13
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
14
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
15
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
16
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
17
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
18
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
19
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
20
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट

Ashadhi Ekadashi 2025: पांडुरंगाने कानात मकरकुंडले का धारण केली? मत्स्यावताराशी काही संबंध?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 13:48 IST

Why Shri Vitthal Wears Fish Kundal: 'सुंदर ते ध्यान' या अभंगात तिसऱ्या चरणात तुकोबा विठूमाऊलीच्या मकरकुंडलांचा उल्लेख करतात, पण ती आली कुठून? वाचा. 

६ जुलै रोजी आषाढी एकादशी (Ashadhi Ekadashi 2025) आहे. त्यादिवशी शांतपणे विठुरायाचे दर्शन कितपत मिळेल याबद्दल शंका आहे, पण पांडुरंगाचे सुंदर ध्यान कायमस्वरूपी मनावर ठसले आहे. ते आठवून पाहिले तर त्याच्या कानातील मकर कुंडलांची अर्थात माशाच्या आकाराच्या कुंडलांची प्रतिमा लगेच डोळ्यासमोर येईल. जाणून घेऊया त्याबद्दल...

Ashadhi Wari 2025: दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात; पण का? वाचा!

आषाढी एकादशीनिमित्त जवळपास ३०० दिंड्या आणि त्यात सहभागी झालेले लाखो वारकरी आषाढी वारीसाठी(Ashadhi Wari 2025) पंढरपूरला रवाना झाले आहेत. आषाढी एकादशीच्या दिवशी सगळ्या पालख्या पंढरपुरात पोहोचतील. विठुरायाच्या दर्शनासाठी आतुर होतील. पण एकूणच गर्दी पाहता काही वारकरी विठ्ठल मंदिराच्या पायरीवर डोकं ठेवून तर काही वारकरी नुसत्या कळसाचे दर्शन घेऊन परत येतील. 'देवाचिये द्वारी उभा क्षणभरी' एवढी संधीदेखील त्यांना मिळेल याची शाश्वती नाही. तरीदेखील ते एवढी पायपीट करत या सोहळ्यात सहभागी होतात. कारण पांडुरंगाचे मूर्त रूप पंढरपुरात स्थित असले तरी त्याचे अमूर्त रूप प्रत्येक भाविकांच्या अंत:पुरात स्थित असते. 

पांडुरंगाचे प्रत्यक्ष दर्शन घडावे एवढी आपली योग्यता नाही, मात्र संतांनी केलेले पांडुरंगाचे वर्णन मनावर ठसले आहे. तुकोबा तर 'सुंदर ते ध्यान' या अभंगात पांडुरंगाच्या सगुण रूपाचे शब्द चित्र रेखाटताना लिहितात, 'मकर कुंडले तळपती श्रवणी...' या मासोळ्यांचा आवर्जून उल्लेख करण्यामागे काय कारण असेल ते पाहू. 

मकर अर्थात मासे. पांडुरंगाच्या भेटीसाठी एक भक्त जो व्यवसायाने कोळी होता, तो देवाच्या भेटीला येताना दोन मासे भेट म्हणून घेऊन गेला. देवाच्या ठिकाणी पावित्र्य जपण्यासाठी मांसाहार निषिद्ध असल्याने तिथल्या व्यवस्थापकांनी ते मासे देवाला अर्पण करण्यापासून कोळ्याला रोखले. कोळी हताश झाला. त्याने देवाला मनोमन हाक मारली आणि आपल्याकडे  याशिवाय द्यायला काहीच नाही असे सांगून माशांचा स्वीकार करावा अशी प्रार्थना केली. त्याची आर्त हाक देवाजवळ पोहोचली. पांडुरंग प्रगट झाले आणि त्यांनी मासोळ्या कानात कुंडल म्हणून धारण केल्या. तेव्हापासून मकर कुंडल हे देवाचे आभूषण झाले. 

Ashadhi Ekadashi 2025: ईश्वरभेटीची सोपी वाट दाखवणार्‍या गुरुंचे आपल्या आयुष्यातील योगदान जाणून घ्या!

तसेच काही जणांच्या म्हणण्यानुसार विष्णूंच्या दशावतारापैकी मत्स्य हा पहिला अवतार असल्याने आणि पांडुरंग हे विष्णू रूप असल्याने ती खूण म्हणूनही भगवंताने मकर कुंडले धारण केली आहेत. 

काही का असेना, तुकोबा म्हणतात तसे ही मकर कुंडले देवाला शोभून तर दिसत आहेतच, शिवाय ती तळपत आहेत. चकाकत आहेत. जसे पाणी चकाकते, तशा मासोळ्या पांडुरंगाच्या कानात चकाकतात. 

राम कृष्ण हरी!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५ashadhi wariआषाढी एकादशी वारी 2025Indian Festivalsभारतीय उत्सव-सणPandharpurपंढरपूरPandharpur Wariपंढरपूर वारी