शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी पांडुरंगाच्या आरतीत उल्लेखलेली 'राही' नेमकी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 13:54 IST

Ashadhi Ekadashi 2025: संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो, पण त्यामागची पार्श्वभूमी माहीत आहे का?

येत्या ६ जुलै रोजी आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi 2025) आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही मोठ्या संख्येने वारकरी पंढरपूरला जायला निघाले आहेत. काल अर्थात १८ जून रोजी संत तुकाराम महाराजांची पालखी निघाली आणि आज १९ जून रोजी ज्ञनेश्वर माऊलींची पालखी निघाली. हा सोहळा उत्तरोत्तर रंगत जाणार आहे. या उत्सवाच्या निमित्ताने आपल्या लाडक्या विठुरायाशी संबंधित गोष्टी जाणून घेऊ. 

Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...

विठ्ठल म्हटल्यावर रखुमाईचे नाव ओघाने येते, तरी संत नामदेवांनी रचलेल्या 'युगे अठ्ठावीस' या आरतीत 'राही रखुमाबाई राणिया सकळा' असा उल्लेख येतो. पांडुरंगाच्या आणखी राण्या आपल्या ऐकिवात नाही, मग हा उल्लेख आला कुठून? त्याबद्दल जाणून घेऊ. 

पांडुरंग, विठ्ठल हे विष्णूंचे रूप आणि महाभारतात श्रीकृष्ण अवतार झाल्यावर थकलेल्या भगवंतांनी चंद्रभागेच्या तीरी येऊन विश्रांती घ्यावी, भक्तांची भेट घ्यावी या विचाराने विठ्ठल रूप घेतले, तर तिथे त्याला भक्ताच्या भेटीसाठी तिष्ठत उभे राहावे लागले. कारण त्याचा भक्त पुंडलिक आई वडिलांची सेवा करत होता. ती झाल्याशिवाय तो भगवंताची भेट घेणार नव्हता. उठून देवाला आसन द्यावे, एवढाही त्याच्याजवळ वेळ नव्हता, म्हणून त्याने जवळच पडलेली वीट पुढे सरकवली आणि तेच आसन म्हणून त्यावर थोडं टेकून घे असे सांगितले. त्याचीच वाट बघत पांडुरंग अठ्ठावीस युगे लोटली तरी तिथेच तिष्ठत उभा आहे. अशा वेळी तो परत आला नाही म्हणून 'गेला माधव कुणीकडे' हे पाहण्यासाठी त्याच्या गोपिका पंढरपुरापर्यंत आल्या. 

Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!

राही कोण? 

राही म्हणजे कृष्ण अवतारातली कृष्ण सखी राधा! तिलाच भगवंताने प्रेमाने राही हे नाव दिले आणि तिचा अपभ्रंश करत आपण तिला राई करून टाकले. मात्र ही राधा रुख्मिणीच्या पाठोपाठ पंढरपुरात आली आणि अन्य गोपिका सुद्धा तिथे पोहोचल्या. भक्त-भगवंतामधील अतूट प्रेम पाहून त्या भारावून गेल्या. त्याच या राणिया सकळा म्हणजेच कृष्णाच्या समस्त गोपिका!

तरी विठ्ठल रुख्मिणीचे मंदिर वेगवेगळे का?

विष्णू लक्ष्मी हे जोडपे वेगवेगळ्या अवतारात वेगवेगळ्या रूपात आपल्याला भेटते. त्यांचाही संसार आहे, फक्त तो विश्वाचा संसार आहे. त्यामुळे त्यांच्यातही वाद विवाद होत राहतात. अशातच श्रीकृष्ण रूपात राधाशी असलेली जवळीक रुख्मिणीला खटकते, म्हणून ती विठ्ठल रूपातल्या कृष्णाला शोधत पंढरपुरापर्यंत आली पण राही अर्थात राधाही तिथे आलेली पाहून दूरवर उभी राहून आपल्या भगवंताला न्याहाळत आहे. म्हणून भक्तांनी त्यांच्यातील मतभेदाचा आदर ठेवून एकाच ठिकाणी दोहोंचे मंदिर उभारले पण ते स्वतंत्र ठेवले. 

Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?

हा रुसवाही लोभस वाटावा इतका गोड आहे. आपल्या पतीवर अन्य कोणी प्रेम केलेले कोणत्याही पत्नीला आवडणार नाही, यात रुख्मिणी मातेचा तर दोष नाहीच, पण राजस सुकुमार असणाऱ्या भोळ्या विठ्ठलाचाही दोष नाही; कारण देही असोनि विदेही अर्थात अलिप्त राहणारे हे ईश्वर तत्व आहे. त्याच्या मायेत आपण सगळे गुंतून गेलेलो आहोत... जय हरी विठ्ठल!

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशी २०२५Pandharpur Wariपंढरपूर वारीIndian Festivalsभारतीय उत्सव-सण