शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

आषाढी देवशयनी एकादशी: ‘असे’ करा व्रत; पाहा, शुभ मुहूर्त, पूजाविधी, मान्यता अन् महत्त्व

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 25, 2023 11:13 IST

Ashadhi Devshayani Ekadashi 2023: वारी करणे शक्य नसले तरी आषाढी एकादशीला घरच्या घरी व्रताचरण करता येऊ शकते. व्रतपूजनाची सोपी पद्धत, शुभ मुहूर्त जाणून घ्या...

Ashadhi Devshayani Ekadashi 2023: भारतीय संस्कृती, परंपरा, सण-उत्सव, व्रत-वैकल्ये यांमध्ये एकादशीला महत्त्व प्राप्त झाले आहे. प्रत्येक मराठी महिन्यात दोन एकादशी येतात. ज्यावर्षी अधिक मास असेल, त्यावर्षी दोन एकादशी अधिक असतात. यंदाच्या चातुर्मासात तसा योग जुळून आला आहे. यावर्षी चातुर्मासातील श्रावण महिना अधिक आहे. आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हटले जाते. या एकादशीपासून चातुर्मासाला सुरुवात होते. कार्तिकी एकादशीला चातुर्मासाची सांगता होते. सन २०२३ मध्ये २९ जून रोजी आषाढी एकादशी आहे. जाणून घेऊया शुभ मुहूर्त, महत्त्व आणि मान्यता...

आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी लाखो वारकरी पंढरपूरला जातात. मनुष्याचे एक वर्ष ही देवांची एक अहोरात्र असते. दक्षिणायन ही देवांची रात्र असून, उत्तरायण हा त्यांचा दिवस असतो, अशी मान्यता आहे. आषाढ महिन्यात येणार्‍या कर्क संक्रांतीला उत्तरायण पूर्ण होऊन दक्षिणायन सुरू होते. म्हणजेच देवांची रात्र सुरू होते; म्हणून आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी, असे म्हटले जाते, असे सांगितले जाते. (Ashadhi Devshayani Ekadashi 2023 Significance)

आषाढी एकादशीचे महत्त्व

आषाढ महिन्याच्या शुद्ध पक्षातील एकादशीला देवशयनी एकादशी म्हटले जाते. काही ठिकाणी ही तिथी पद्मनाभा एकादशी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचे महत्त्व अतिशय वेगळे आहे. विठ्ठलाच्या भेटीची ओढ लागलेले वारकरी पंढरपुरात दाखल होतात. राज्यातील विविध भागांतून लाखों वारकरी पायी पंढरपूरला जातात. संत ज्ञानेश्वरांपासून ते जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांपर्यंत अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरला मार्गस्थ होतात. विठुनामाच्या गजरात तहान-भूक हरपून वारकरी विठ्ठलाचे दर्शन घेतात. (Ashadhi Devshayani Ekadashi 2023 Date Time And Shubh Muhurat)

आषाढी एकादशीचा मुहूर्त

आषाढ महिन्यात सुरू झालेली देवतांची रात्र, कार्तिक महिन्यातील एकादशीला समाप्त होते. कार्तिक महिन्यात देवकार्ये सुरू होत असल्याने त्या एकादशीला प्रबोधिनी एकादशी असे म्हटले जाते.

आषाढी देवशयनी एकादशी प्रारंभः गुरुवार, २९ जून २०२३ रोजी पहाटे ०३ वाजून १८ मिनिटे.

आषाढी देवशयनी एकादशी समाप्तीः शुक्रवार, २९ जून २०२३ रोजी मध्यरात्री ०२ वाजून ४१ मिनिटे.

आषाढी देवशयनी एकादशीची मान्यता

काही पुराणांमधील उल्लेखानुसार, श्रीविष्णूंनी वामन अवतार धारण करून बळी राजाला पाताळात धाडले होते. त्याचप्रमाणे बळी राजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचनही दिले होते. बळी राजाला दिलेल्या वचनाचे पालन करण्यासाठी श्रीविष्णू द्वारपाल म्हणून पाताळात जातात. हा काळ आषाढी एकादशी ते कार्तिकी एकादशीचा मानण्यात आला आहे. श्रीविष्णू आषाढी एकादशीला बळीच्या राज्यात जातात आणि कार्तिकी एकादशीला स्वगृही क्षीरसागरात परतात, अशी मान्यता आहे. त्यामुळे आषाढी एकादशी देवशयनी आणि कार्तिक एकादशी प्रबोधिनी नावाने ओळखली जाते. (Ashadhi Devshayani Ekadashi 2023 Vrat Puja Vidhi)

आषाढी एकादशीचा व्रतपूजाविधी

वर्षभरात येणाऱ्या सर्व एकादशी दिनी भगवान श्रीविष्णूंचे पूजन केले जाते. आषाढी एकदशीचे व्रताचरण करणाऱ्यांनी आषाढी एकादशी व्रत आणि श्रीविष्णू पूजनाचा संकल्प करावा. श्रीविष्णूंची चौरंगावर स्थापना करावी. श्रीविष्णूंचे आवाहन करावे. यानंतर पंचामृत अभिषेक अर्पण करून त्याचाच नैवेद्य दाखवावा. मुख्य अभिषेक करावा. अभिषेक झाल्यानंतर वस्त्र, गंध, अक्षता, तुळशीची पाने, ऋतुकालोद्भव फुले, फळे श्रीविष्णूंना अर्पण करावीत. धूप, दीप आणि नैवेद्य दाखवून श्रीविष्णूंची आरती करावी. यानंतर मनापासून नमस्कार करून सर्वांना प्रसादाचे वाटप करावे. शक्य असल्यास विष्णू सहस्रनामाचे पठण करावे. यथाशक्ती दान करावे.

 

टॅग्स :Ashadhi Ekadashiआषाढी एकादशीashadhi wariआषाढी एकादशीची वारी 2022PandharpurपंढरपूरReligious programmeधार्मिक कार्यक्रमspiritualअध्यात्मिक