शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 19:45 IST

Ashadh Gupta Navratri 2025: आषाढ प्रतिपदा ते नवमी वराही देवीचे गुप्त नवरात्र सुरू झाले आहे, या काळात केलेली उपासना लवकर फळते, त्याबद्दल जाणून घेऊ.

>> योगेश काटे, नांदेड 

आजपासून आषाढ महिना सुरु झाला व त्यासोबत वराही देवीचे आषाढी गुप्त नवरात्र(Ashadh Gupta Navratri 2025) सुरु झाले आहे. हिंदु कालगणनेप्रमाणे हा चौथा महिना या महिन्याचे प्राचीन नाव शुचि आहे. या महिन्याच्या पौर्णिमेस पूर्वाषाढा किंवा उत्तराषाढा नक्षत्रास चंद्र असतो म्हणून याला आषाढ हे नाव पडले. सूर्य मिथुन राशीत असताना आषाढास सुरुवात होते. कर्कसंक्रमणास सुरुवात आणि मकरसंक्रमणापर्यंत दक्षिणायन असते. या महिन्यात महाराष्ट्रात पावसाचा जोर असतो  म्हणजे बोली भाषेत आषाढी झड असंही म्हणतात. या महिन्यात तीन वेळा आखाड तळणं करण्याची प्रथा मराठवाड्यात आहे. या महिन्यात मूळ नक्षत्री चंद्र असतो त्या दिवशी बेंदूर सण साजरा करतात. कोकणात आषाढ शु. तृतीया या तिथीला गुरांची पुजा केली जाते. 

Astrology: शुक्रवारी गौरी योगात पाच राशींवर लक्ष्मीकृपा होणार; धनधान्याची काळजी मिटणार!

  • या महिन्यातील महत्वाच्या तिथी आणि लवकर विवाह होण्यासाठी करावयाचे उपाय जाणून घेऊ. 
  • आषाढ शु.प्रतिपदा गुप्तनवरात्र सुरुवात, तसैच टेंबे स्वामी यांचा समाराधना दिन.
  • आषाढ शु. द्वितीयेस जगन्नाथ रथयात्रा 
  • आषाढ शु. एकादशी ( देवशयनी) चातुर्मास सुरुवात.
  • आषाढ पौर्णिमा गुरुपौर्णिमा ( व्यासपुजा)
  • आषाढ वद्य पंचमी प.बंगाल व उ.भारतात मनसा पंचमी म्हणतात  हि नाग देवता  म्हणुन पुजा करतात. 
  • आषाढ  अमावस्या दीपपुजन 
  • दिव्यांची अमावस्या.

विवाहेच्छुक मंडळींनी आषाढ मासात केलेली उपासना लवकर फळते, ती कशी करायची ते जाणून घेऊ. 

आषाढारंभ:आषाढापासून ४ महिने आध्यात्मिक वातावरण आणि सण, उत्सव, व्रत, वैकल्याची रेलचेल!

अविवाहित मुलींसाठी उपाय : 

>> ज्या मुलींची लग्ने होत नाहीत त्यांनी आषाढ महिन्यातील गुप्त नवरात्रीमध्ये सकाळी पाण्यात हळद टाकून स्नान करावे. यानंतर जमिनीवर आसन घालून बसावे. उत्तरेकडे तोंड करून देशी तुपाचा दिवा लावा. मग माता कात्यानी मातेचा पुढे दिलेला मंत्र म्हणावा - 

महामाये महायोगिन्यधीश्वरी। नन्दगोपसुतं देवी, पति मे कुरु ते नमः।।

>>  यामुळे वैवाहिक जीवनातील सर्व अडचणी दूर होतील. तुम्हाला तुमचा इच्छित जीवनसाथीही मिळेल.

अविवाहित पुरुषांसाठी उपाय :

>> ज्योतिषशास्त्रानुसार ज्या पुरुषांचे लग्न होत नाही त्यांनी गुप्त नवरात्रीमध्ये कुलदेवीची रोज पूजा करावी. तसेच पुढील मंत्राचा १०८ वेळा जप करावा. 

पत्नीं मनोरमां देहि मनोवृत्तानु सारिणीम्। तारिणींदुर्गसं सारसागरस्य कुलोद्भवाम्

>> या उपासनेमुळे योग्य वधू मिळण्यास मदत होईल. तसेच विवाहाशी संबंधित सर्व समस्या दूर होतील.

Chaturmas 2025: २६ जून ते ६ जुलै घ्या आषाढ तळणीचा आनंद, नंतर मात्र चातुर्मासाचे पाळा बंधन!

टॅग्स :Navratriनवरात्रीPuja Vidhiपूजा विधीAstrologyफलज्योतिषIndian Festivalsभारतीय उत्सव-सण