शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

Anant Chaturdashi 2025: अनंत चतुर्दशीला का बांधला जातो अनंताचा धागा? हे व्रत गणेशाचे नाही तर... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2025 15:53 IST

Anant Chaturdashi 2025 Information in Marathi: अनंत चतुर्दशी हा केवळ गणपती विसर्जनाचा दिवस नाही तर त्यादिवशी अनंताचे व्रत केले जाते आणि धागाही बांधला जातो, त्याबद्दल सविस्तर जाणून घ्या. 

यंदा शनिवार ६ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशीने या वर्षीच्या गणेशोत्सवाची(Ganesh Festival 2025) सांगता होणार आहे. बुद्धिदात्या, विघ्नहर्त्या बाप्पाकडे तुम्ही यश, समृद्धी, कीर्ती आणि बरेच काही मागितले असेल. त्यालाच जोड द्या अनंताच्या धाग्याची! अनंत चतुर्दशीला (Anant Chaturdashi 2025) भगवान विष्णूंची अनंत या नावे पूजा केली जाते व पूजेत अनंताचा धागा ठेवून पूजा झाल्यावर हा धागा मनगटावर बांधला जातो. 

असे म्हणतात की जेव्हा पांडवांनी द्युतात सर्वकाही गमावले होते, तेव्हा भगवान श्रीकृष्णाने त्यांना पुन्हा वैभव मिळवण्यासाठी अनंत चतुर्दशीचे व्रत करण्यास सांगितले. तसेच भगवान विष्णूंचे हे रूप ज्याला आदी नाही आणि अंत नाही, अशा स्वरूपाची पूजा केल्याने सर्व दुःख आणि वेदना दूर होतात.परंतु अनंत चतुर्दशीचे व्रत तसे पाहता थोडे अवघड आहे. परंतु ज्यांना ते व्रत १४ वर्षे करणे शक्य नाही, त्यांनी निदान भगवान विष्णूंची पूजा करून अनंताचा धागा बांधावा आणि आपल्या मार्गातील अडथळे दूर होऊन यश प्राप्त व्हावे, अशी भगवान विष्णूंना प्रार्थना करावी. त्याचा थोडक्यात विधी जाणून घेऊया. 

>> अनंत चतुर्दशीच्या (Anant Chaturdashi 2025) दिवशी भगवान विष्णूच्या अनंत स्वरूपाची पूजा केल्यानंतर अनंताचा धागा बांधला पाहिजे. या चमत्कारी धाग्यात प्रत्येक दुःख आणि दैन्यातुन मुक्त होण्याची शक्ती आहे. हा अनंत धागा मनगटावर बांधला जातो. त्यात १४ गाठी असतात. हा धागा पुरुषांच्या उजव्या हाताला आणि स्त्रियांच्या डाव्या हाताला बांधला जातो. 

>> १४ गाठींचा धागा बाजारात उपलब्ध होतो. परंतु तसा धागा न मिळाल्यास लाल धाग्याला चौदा गाठी मारून तो धागा पूजेत ठेवावा. ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा १०८ वेळा जप करून तो धागा विष्णूंच्या पायी लावून मग आपल्या मनगटाला बांधावा. 

>> या १४ गाठी भगवान विष्णूच्या प्रत्येक स्वरूपाचे प्रतीक आहेत. हे सूत्र परिधान केल्यानंतर, किमान १४ दिवस मांसाहार, मद्य, तसेच शारीरिक संबंध टाळावेत असे शास्त्र सांगते. आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून क्षणिक मोहाला बळी पडू नये, यासाठी हे धर्माचरण सुचवले असावे.

>> ज्यांनी आयुष्यात सर्वस्व गमावले आहे, जर त्यांनी हे सूत्र बांधले तर त्यांना नवीन ऊर्जा मिळते. हे सूत्र प्रत्येक दुःख आणि दुःख दूर करते आणि जीवन आनंदाने भरते.

>> शक्य असल्यास अनंत सूत्र धारण केल्याच्या दिवशी उपवास ठेवा आणि श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्राचे पठण करावे. यामुळे आत्मबळ वाढते आणि व्यक्तीला संपत्ती, सुख-समृद्धी सर्व काही मिळते.

>> एक धागा बांधल्याने खरेच हे सर्व शक्य होऊ शकते का, असा अनेकांना प्रश्न पडेल. परंतु हा केवळ धागा नाही, तर ही ऊर्जा आहे. स्वतःला दिलेला आत्मविश्वास आहे. जर पांडव त्यांचे वैभव मिळवू शकतात, तर आपण आपले गमावलेले किंवा आजवर केवळ स्वप्नात पाहिलेले वैभव का मिळवू शकणार नाही? नक्कीच मिळवू शकू. भगवंत आपल्या पाठीशी आहेच आता फक्त प्रयत्नांची जोड द्यायची आहे. त्याची आठवण हा धागा सातत्याने देत राहील, यासाठी हे व्रताचरण करायचे असते. 

टॅग्स :Ganpati Festivalगणपती उत्सव २०२५Ganesh Visarjanगणेश विसर्जनGanesh Festival Ritualsगणेशोत्सव विधीPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीganpatiगणपती 2025