शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Adhik Maas 2023: अधिक मासात नदी किंवा संगमात स्नान करावे;शक्य नसेल तर प्रत्यक्ष दर्शन तरी घ्यावे, कारण... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2023 14:25 IST

Adhik Maas 2023: नदीचे विशाल पात्र, समुद्र किंवा जलाशय पाहिला तरी निसर्गासमोर कृतज्ञतेने आपले हात जोडले जातात, अधिक मासात त्यात स्नानही महत्त्वाचे!

>> हृषीकेश श्रीकांत वैद्य 

आपण पूर्वी बघितले असेल की ट्रेन ने जाताना नदी किंवा खाडी (नदी - समुद्र संगम) लागला की बहुतांश लोकांचे हात आस्थेने जोडले जायचे. काही जण लहान मुलांना त्यात अर्पण करण्यासाठी नाणी द्यायचे. तर, आपले पूर्वज नक्की का करायचे असं? तर, संगम किंवा नदी हे जीव आणि शिवाच्या एकरूप होण्याचे प्रतीक आहे. जसा सागरापासून बाष्पीभवनामुळे तयार झालेला ढग दूर गिरी पर्वतांवर जाऊन बरसतो, त्या प्रत्येक थेंबाला आपल्या मूळ स्वरूपात म्हणजेच सगरात एकरूप होण्याची ओढ लागलेली असते. अनेक पर्वतरांगा, दऱ्या, अरण्य, इ पार करत करत तो थेंब सागराच्या दिशेने धाव घेत असतो व अंततोगत्वा शेवटी तो सागराला जाऊन मिळतो त्यात एकरूप होतो. 

जसा एक छोटा थेंब जिद्दीने सागरात जाऊन एकरूप होतो  त्याचप्रमाणे आपला आत्मा हा त्याच्या मूळ तत्वात म्हणजेच परब्रह्म परमेश्वराशी एकरूप होवो ही नमस्कार करण्यामागची  भावना. आपल्या जीवनाचा नेमका उद्देश्य काय आहे? आपण जन्माला का आलो? आपण नक्की काय करत आहोत ? का करत आहोत ? नक्की काय करायला हवं ? काय साध्य करायला हवं ? हे प्रश्न जो पर्यंत आपल्याला पडत नाहीत व योग्य गुरूंकडून त्याची उत्तरे मिळत नाहीत तो पर्यंत आपला जन्म घेणेच व्यर्थ आहे ! 

गंगेपुढे मन शांत होते. गंगा हे परमेश्वराचे चिन्ह आहे. गंगास्नानाने पापक्षालन होते. परंतु त्यासाठी आपला भाव चांगला असावा लागतो. या गंगास्नानाचे दुसरे महत्त्व असे की, आपल्या पाठीमागे कायम ग्रहपीडा असते. कोणाला शनीपीडा, कोणाला मंगळ पीडा असते, या सर्व पीडा गंगेच्या पाण्याने कमी होत जातात. 

हिमालयात गंगेचा उगम होतो, त्या ठिकाणाला गंगोत्री म्हणतात. तेथूनच ती ऋषिकेश व हरिद्वारला येते. जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिथे अवश्य जाऊन या. तोवर आपल्या हाती असलेले पाणी गंगेचे पुण्य स्मरण करून तीर्थ समजून प्या व पाण्याची नासाडी न होता ते जपून वापरा. आणि पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व लक्षात घेऊन नदी, संगम किंवा कोणताही जलस्त्रोत्र दिसल्यावर नतमस्तक जरूर व्हा आणि अधिक मासात नदी स्नानाची संधी दवडू नका!

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना