शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

Adhik Maas 2020: लीडरशिप क्वालिटी कशी असली पाहिजे, हे शिकवणारा, भगवान महाविष्णूंचा हा श्लोक

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 27, 2020 7:30 AM

Adhik Maas 2020: 'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? अशावेळी नेतृत्व हवेच!

ठळक मुद्देशांत डोक्याची व्यक्तीच कठीणात कठीण परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. संकट कितीही मोठे असो, ते गुंडाळून त्यावर स्वार होता आले पाहिजे.नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला संकटातही संधी शोधून सकारात्मक दृष्टीकोन देता आला पाहिजे. 

ज्योत्स्ना गाडगीळ. 

काही श्लोक आपल्या रोजच्या म्हणण्यातले असतात, तरीदेखील त्याच्या अर्थाकडे आपले लक्ष जात नाही. केवळ तोंडपाठ असतात म्हणून आणि सवयीचा भाग म्हणून ते नित्यनेमाने म्हटले जातात. तसाच हा भगवान महाविष्णूंची स्तुती आणि वैशिष्ट्ये सांगणारा हा श्लोक आपण रोज म्हणतो. अधिक मासानिमित्त या श्लोकाचा अर्थ समजून घेऊ. 

शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशम्, विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णम् शुभांगम्लक्ष्मीकांतं कमलनयनं योगिभिर्ध्यानिगम्यम्, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं।।

'आप लढो, हम कपडे संभालते है' अशी पुळचट भूमिका प्रत्येकाने घेतली असती, तर दुष्टांचा नायनाट आणि सज्जनांचा उद्धार कोणी केला असता? म्हणून गर्दीला मार्ग दाखवायला मार्गदर्शक लागतोच. मोहिमेची अंमलबजावणी करायला नेता लागतोच. शत्रूशी दोन हात करायला सेनापती लागतोच, तसाच आयुष्याला दिशा दाखवणारा गुरु लागतोच. या सर्व भूमिका एकत्रपणे एकहाती सांभाळणारे कुशल दैवत म्हणजे, भगवान महाविष्णू! 

हेही वाचा: Adhik Maas २०२०: आपण नैवेद्य दाखवतो, की अर्पण करतो? 

त्यांच्या व्यक्तीमत्त्वाचे गुणविशेष या श्लोकात वर्णन केले आहेत. कोणत्याही समूहाचे, कार्याचे नेतृत्त्व करणाऱ्या नेत्याकडे, नायकाकडे हे गुण असले पाहिजेत. भगवान महाविष्णूंना त्यांनी आपले आदर्श मानले पाहिजे.  

शांताकारं - व्यक्ती नुसती शांत असून उपयोगी नाही. अनेकदा वरवर शांत दिसणारी व्यक्ती आतून धुमसत असते, अस्वस्थ असते, चरफडत असते. अशा व्यक्तीची तुलना जिवंत बॉम्बशी केल्यास अतिशयोक्ती होणार नाही. कारण, अशी व्यक्ती स्फोटक ठरू शकते. मात्र, व्यक्ती केवळ शांत `दिसून' उपयोगी नाही, तर ती अंतर्बाह्य `शांत'ही असावी लागते. शांत डोक्याची व्यक्तीच कठीणात कठीण परिस्थिती नियंत्रणात आणू शकते. 

भुजगशयनम् - शांत कोणीही बसेल हो, पण भुजंगाची शय्या, म्हणजे फारच झाले. घरात छोटसे फुरसे आढळले, तरी लोक दहा आकडी सापडल्याचे वर्णन करून फुशारक्या मारतात. सर्पमित्र येऊन भोवऱ्याची दोरी पकडावी, तसे अलगद उलचून घेऊनही जातात. इथे तर शेषराजांवर स्वार होऊन भगवंत कृष्णावतारात नाचत आहेत, विष्णू अवतारात झोपत आहेत. या प्रतिकात्मक रूपकातून महाविष्णूंनी दाखवून दिले आहे, की संकट कितीही मोठे असो, ते गुंडाळून त्यावर स्वार होता आले पाहिजे. संकटकाळातही सहजतेने आयुष्य जगता आले पाहिजे. तरच तुम्ही इतरांना धीर देऊ शकाल. नायकाने घाबरून, डगमगून चालत नाही. तो स्थिर असला, तरच त्याचे अनुयायी त्याचे अनुकरण करणार आहेत. आणि नायकाचे वेगळेपण अधोरेखित होणार आहे, पद्मनाभं सुरेशम्!

हेही वाचा: Adhik Maas  २०२०: अधिक मासात प्रभावी ठरते, एकभुक्त व्रत.

विश्वाधारम् गगनसदृशम्- `मजधार में नैया डोले, तो माझी पार लगाए, माझी जो नाव डुबोए उसे कौन बचाए' हीच अवस्था नेतृत्त्वाच्या बाबतीत असते. आजवर, या अखिल विश्वावर एवढी संकटे आली, त्यांचा निभाव लावताना विष्णू डळमळीत झाले नाहीत, उलट त्यांनी विश्वाला आधार दिला म्हणून त्यांना जगद्पालक अशी बिरुदावली मिळाली. पृथ्वीच्या टोकावर कुठेही गेलात, तरी विस्तीर्ण आकाश जसे आपली साथ सोडत नाही, तसे सर्वव्यापक भगवान महाविष्णू गगनसदृश्य आहेत. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर ते आपल्या पाठीशी आहेत. 

मेघवर्णम् शुभांगम् - मेघांसारखी त्यांची श्यामल कांती आहे आणि मेघाप्रमाणेच प्रेमाचा वर्षाव करण्याचे सामर्थ्य आहे. त्यांना पाहून कोणालाही आनंदच होईल, असे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे, म्हणून त्यांना शुभांगम् म्हटले आहे. 

लक्ष्मीकांतं कमलनयनम् - शब्दश: ज्यांच्या घरात लक्ष्मी पाणी भरते, असे महाविष्णू कामे थांबवून निष्क्रिय झालेले नाहीत, तर त्यांनी जगराहाटीचा व्यवहार सुरू ठेवला आहे. आपल्या कमलनयनांनी, कृपादृष्टीने ते जगाकडे पाहत आहेत. कमलनेत्राचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, सकारात्मक दृष्टीकोन. कमळ चिखलात उगवते, तरीही सुंदर, टवटवीत असते. चिखलात राहूनही, स्वत:ला डाग लावून न घेता आपले आयुष्य आनंदाने जगते. तसेच नेतृत्व करणाऱ्या व्यक्तीला संकटातही संधी शोधून सकारात्मक दृष्टीकोन देता आला पाहिजे. 

अशा भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी योगी, तपस्वी, ऋषी, मुनी, भाविक सदैव धडपडत असतात...योगिभिर्ध्यानिगम्यम्. मात्र, भगवान महाविष्णू केवळ शूर, साहसी आणि सत्याची कास धरणाऱ्या व्यक्तीलाच साथ देतात. म्हणून आपणही त्यांच्या कृपेस पात्र होऊया. साऱ्या विश्वावर कोणतेही संकट आले, तरी ते पार करण्यासाठी लागणारे धैर्य मागुया व या विश्वाचे कल्याण होवो, हे दान पदरात पाडून घेऊया, वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथं. 

हेही वाचा: Adhik  Maas 2020: दारात तुळशी वृंदावन लावा, लक्ष्मीसोबत लक्ष्मीपतीही येतील!

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना