Adhik Maas  २०२०: अधिक मासात प्रभावी ठरते, एकभुक्त व्रत

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 25, 2020 07:30 AM2020-09-25T07:30:00+5:302020-09-25T07:30:02+5:30

सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे.

Adhik Maas 2020: Monotheistic fast, Effective in ADhik Maas. | Adhik Maas  २०२०: अधिक मासात प्रभावी ठरते, एकभुक्त व्रत

Adhik Maas  २०२०: अधिक मासात प्रभावी ठरते, एकभुक्त व्रत

googlenewsNext
ठळक मुद्देशरीराला व पचनसंस्थेला विश्रांती मिळणे, असा एकभुक्त राहण्यामागे हेतू असतो.अन्न ही यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा.एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे.

ज्योत्स्ना गाडगीळ 

एकभुक्त राहणे, म्हणजे दिवसभरातून एकवेळ जेवणे. मुख्यत: चातुर्मासात अनेक जण एकभुक्त राहणे पसंत करतात. मात्र, अधिक मासात एकभुक्त व्रत अंगिकारले, तर ते अधिक फलदायी ठरते, असे हिंदू पंचांगामध्ये लिहिले आहे.

अलीकडच्या काळात, आपण ज्याला 'डाएट' म्हणतो, किंवा आयुर्वेदातील परिभाषेनुसार 'लंघन' म्हणतो, तीच सोय धर्मशास्त्राने व्रत-वैकल्यांच्या नावे करून ठेवली आहे. 

हेही वाचा: Adhik  Maas 2020: दारात तुळशी वृंदावन लावा, लक्ष्मीसोबत लक्ष्मीपतीही येतील!

एकभुक्त व्रतामागील हेतू. 

चातुर्मासातील आषाढ, श्रावण, भाद्रपद या तीन महिन्यांत आपल्या देशात पावसाळा असतो. यावेळी पचनशक्ती मंदावलेली असते. त्यामुळे शरीराला व पचनसंस्थेला विश्रांती मिळणे, असा एकभुक्त राहण्यामागे हेतू असतो. या तीन पावसाळी महिन्यांना जोडूनच अधिक अश्विन मास आल्यामुळे आपल्यालाही एकभुक्त राहून आरोग्य व आध्यात्म यांचा मेळ घालता येईल. 

मनावर नियंत्रण : 

'कुछ पाने के लिए कुछ खोना पडता है।' असे म्हणतात. अधिक मासाचे फळ मिळावे, असे वाटत असेल, तर अन्नावरील वासना कमी करून आपल्या दैनंदिन कार्यात, पूजे-अर्चेत मन रमवावे, यासाठी हे एकभुक्त व्रत करता येईल. त्यामुळे आपोआपच मनावर नियंत्रण येते आणि त्याग भावना बळावते. 

प्रतिकुल परिस्थितीत तग धरण्याची शिकवण:

सहा महिन्यांपासून आपण सगळेच जण घरी आहोत. एकवेळ, बाहेर पडल्यावर, कामात गुंतल्यावर तहान-भूकेचे भान राहत नाही, परंतु २४ तास घरात असल्यावर उठ-सूट भूक लागत राहते. अकारण वजन वाढते. स्थूलत्त्व येते आणि पोटाला वरचेवर खाण्याची सवय लागते. घरात असताना ही सवय ठीक आहे, परंतु घराबाहेर असताना आपल्याला सतत अन्नपुरवठा कोण करणार आहे? आणि बाहेर जे अन्न उपलब्ध असते, ते शरीराला हितकारक असेलच असे नाही. अशा वेळी, भूकेवर नियंत्रण मिळवता आले पाहिजे. अन्यथा कोणत्याही कामात मन लागणार नाही आणि आपली चिडचिड होत राहील. अशा व्रतांमुळे संयम अंगी बाणला जातो. शिवाय, दुष्काळ, अन्नटंचाई, आर्थिक टंचाई अशा आस्मानी- सुलतानी संकटात तना-मनाने तग धरता येते आणि मीठ-भाकरीवरही तृृप्तता मानता येते. 

हेही वाचा: Adhik Maas 2020: हिरण्यकशिपूच्या वधासाठी विष्णूंनी अधिक मासातच घेतला नृसिंह अवतार; वाचा, कारण अन् कथा

जाणिजे यज्ञकर्म : 

जेवायला बसताना आपण एक श्लोक म्हणतो. 'वदनी कवळ घेता.' त्या श्लोकाच्या शेवटी महत्त्वपूर्ण सूचना केली आहे, `उदर भरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म!' म्हणजेच अन्नग्रहण करताना भगवंताचा आठव करा आणि त्याच्या कृपेने आपल्याला सुग्रास भोजन मिळत आहे, याबद्दल त्याचे आभार माना. शिवाय, जे अन्न ग्रहण करत आहात, ते पोटाची किंवा मनाची तृप्ती व्हावी यासाठी नाही, तर हा एक यज्ञ आहे असे समजा आणि अन्न ही त्या यज्ञातील आहुती समजून, गरज आहे तेवढेच ग्रहण करा. तरच, त्या अन्नाचे ऊर्जेत रुपांतर होऊन, ती ऊर्जा दिवसभरात चांगल्या कामासाठी वापरली जाईल. 

पोषणकर्ता महाविष्णूंना एकवेळचे जेवण समर्पित :

सृष्टीचालक भगवान महाविष्णूंना मुंगीपासून हत्तीपर्यंत सर्व जीव-जीवांचे पोषण करायचे असते. त्यांच्या या महत्कार्यात आपला खारीचा वाटा, या भावनेने आपण एकभुक्त राहून आपल्या वाट्याचे एकवेळचे जेवण गरजू व्यक्तीला द्यावे. किंवा एकवेळच्या जेवणाचा शिधा (कोरडे धान्य, तांदूळ, पीठ, तेल, मीठ) द्यावे. एवढ्याशा सेवेने कोणा गरजूचे आशीर्वाद मिळाले, तर ती सेवा भगवान महाविष्णूंच्या चरणी रुजू झाली असे समजावे.

हेही वाचा: Adhik Maas 2020: अधिक महिन्यात कोणते संकल्प करावेत?; काय आहे महत्त्व?... जाणून घ्या

Web Title: Adhik Maas 2020: Monotheistic fast, Effective in ADhik Maas.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.