शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

Adhik Maas 2020: विष्णुसहस्रनाम रोज ऐका, 'अधिक' मासाचे 'अधिक' फळ मिळवा!

By ज्योत्स्ना गाडगीळ | Published: September 18, 2020 4:28 PM

Adhik Maas 2020: जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो -महर्षी व्यास

ठळक मुद्देअधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो. मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तना-मनावर सकारात्मक बदल दिसून येतात. 

ज्योत्स्ना गाडगीळ 

विष्णुसहस्रनाम या स्तोत्रात भगवान महाविष्णुंच्या १००० नावांचा उल्लेख आहे. 'अधिक मास' हा 'पुरुषोत्तम मास' म्हणून ओळखला जातो, कारण या महिन्यावर भगवान महाविष्णुंचे स्वामीत्त्व असते. म्हणून अधिक मासात अधिक फलप्राप्तीसाठी रोज सायंकाळी विष्णुसहस्रनाम म्हटले किंवा ऐकले जाते. 

ज्याप्रमाणे एखाद्या व्यक्तीचे नाव घेताच, त्याचे व्यक्तिमत्त्व डोळ्यासमोर उभे राहते, तसे भगवान महाविष्णुंच्या १००० नामांमधून त्यांचे वैविध्यपूर्ण कार्य डोळ्यासमोर येते. विष्णुंच्या नावाबरोबर त्यांच्या कार्याचीही उजळणी व्हावी, या हेतूने महाभारत कालापासून हे स्तोत्र मोठ्या भक्तीभावाने म्हटले जात आहे. महाभारताच्या 'अनुशासनपार्वान्तर्गत', 'दानधर्म' पर्वामध्ये १४९ व्या अध्यायात विष्णुसहस्रनाम स्तोत्राचा उल्लेख आढळतो. 

हेही वाचाः अधिक मास म्हणजे काय?... या 'बोनस' महिन्यात काय करावं, काय टाळावं?... जाणून घ्या 

विष्णुसहस्रनामाचा महाभारतातील उल्लेख : 

शरपंजरी असताना भीष्माचार्यांना युधिष्ठीराने विचारले, सर्व जगामध्ये एकच देव कोणता आहे? कोणत्या देवाची भक्ती केली असता, मनुष्याचे कल्याण होऊ शकते? सर्व धर्मात श्रेष्ठ धर्म कोणता? आणि कोणत्या दैवताचा जप केला, तर मनुष्य जन्म-मरणाच्या फेऱ्यातून आणि संसार बंधनातून मुक्त होतो?

त्यावर भीष्माचार्य म्हणाले, 'भगवान पुरुषोत्तमाचे सहस्रनाम निरंतर घेतले असता, मनुष्य हरतऱ्हेच्या दु:खावर मात करू शकतो. हे स्तोत्र सर्वांना हितकारी आहे. प्राणीमात्रांची कीर्ती वाढवणारे आहे. मन:शांती देणारे आहे. त्याचे नित्य पारायण करण्याने मनुष्य सर्व क्षेत्रात यशस्वी होतो. भिष्माचार्य हे वर्णन सांगत असताना भगवान श्रीकृष्णदेखील तिथे उपस्थित होते आणि त्यांच्या वक्तव्याला अनुमोदन देत होते.  महाभारत रचैते महर्षी व्यास यांनीदेखील सांगितले आहे, की 'जो विष्णुसहस्रनामाचे पठण किंवा श्रवण करतो, त्याचे काहीच अशुभ होत नाही. त्याला आत्मसुख, लक्ष्मी, धैर्य प्राप्त होऊन त्याचा सर्वत्र विजय होतो. 

जगद्गुरु शंकराचार्यदेखील या स्तोत्राला दुजोरा देताना म्हणतात,

>> भगवद्गीता आणि विष्णुसहस्रनामाचे पारायण करा.

>> भगवंताचे चिंतन करा.

>> सत्संग करा. 

>> दीनजनांना दान करा. 

या चार गोष्टी केल्यामुळे आयुष्य सोपे होईल. 

हेही वाचाः वेदांचे सार श्रीमद् भगवद्गीता

विष्णुसहस्रनामाचे फायदे : 

>> आर्थिक, वैवाहिक, सामाजिक, राजकीय प्रश्नांतून मार्ग मिळतो. 

>> गर्भधारणेसंबंधी समस्या दूर होतात. गर्भसंस्काराच्या वेळी स्तोत्र ऐकले असता, बालकावर चांगले संस्कार होतात. 

>> ग्रहदशा कुठलीही असो, विष्णुसहस्रनामाचे पठण केल्यामुळे मन:शांती लाभते, भय कमी होते आणि संकटावर मात करण्याचे बळ मिळते.

>> मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल, घरात वादविवाद होत असतील, तर विष्णुसहस्रनामाचे सामुहिक पठण करावे. निश्चित लाभ होतो. 

विष्णुसहस्रनामाचे पठण कसे व कधी करावे?

कोणत्याही स्तोत्राचे पठण व स्पष्ट उच्चार अतिशय महत्त्वाचे असतात. तरच, स्तोत्राचा योग्य परिणाम होतो. हे मंत्र उच्चार मोठ्याने म्हटल्यास सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि तना-मनावर सकारात्मक बदल दिसून येतात. 

>> स्तोत्र पाठ नसेल, तर युट्यूबवर विष्णुसहस्रनामाचे अनेक व्हिडिओ उपलब्ध आहेत. रोज सायंकाळी दिवेलागण झाली, की मोठ्या आवाजात हे स्तोत्र लावावे. विशेषत: दक्षिणेकडील प्रख्यात गायिका एम.एस. सुब्बालक्ष्मी यांनी म्हटलेले विष्णुसहस्रनाम मंत्रमुग्ध करते.

>> स्तोत्र केवळ कानावर पडून उपयोग नाही. त्याचे शब्द डोळ्यांसमोर असले, तर लक्ष विचलित होत नाही. म्हणून स्तोत्र श्रवणाबरोबर हातात पोथी घेऊन त्याचे नित्य पठणही करावे. म्हणजे मन एकाग्र होण्यास मदत होते. 

>> अधिक मासात १०८ वेळा हे स्तोत्र म्हणण्याचा संकल्प केल्यास, अधिक लाभ होतो असा भाविकांना अनुभव आला आहे. 

>> सत्यनारायण पूजेत विष्णुसहस्रनाम घेतले जाते. म्हणून अधिक मासात अनेक ठिकाणी सत्यनाराण पूजेचे आयोजन केले जाते.

टॅग्स :Adhik Maasअधिक महिना