२०२५ला पूर्ण होतील सर्व इच्छित मनोकामना, व्यंकटेश स्तोत्र म्हणा; नियम अन् अधिक माहिती वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2024 07:19 IST2024-12-31T07:19:05+5:302024-12-31T07:19:05+5:30
Shree Venkatesh Stotra: इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी, ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र मानले जाते. जाणून घ्या...

२०२५ला पूर्ण होतील सर्व इच्छित मनोकामना, व्यंकटेश स्तोत्र म्हणा; नियम अन् अधिक माहिती वाचा!
Shree Venkatesh Stotra: भगवान श्री व्यंकटेश हे बालाजी, वेंकटेश्वर आणि तिरुपती बालाजी अशाही नावांनी ओळखले जाते. हिंदू धर्मातील सर्वांत लोकप्रिय देवतांपैकी एक श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी आहेत. देश-विदेशातून कोट्यवधी भाविक, भक्त, पर्यटक व्यंकटेश देवाचे दर्शन घेण्यासाठी येत असतात. तिरुपती बालाजी मंदिर सर्वांत श्रीमंत मंदिरांपैकी एक असेच आहे. येथे भाविक जे दान करतात, त्याचेही प्रमाण प्रचंड असते. २०२५ सुरु होत आहे. अनेक संकल्प, इच्छा, आकांक्षा, ध्येय समोर ठेवून नवीन २०२५ या वर्षात पदार्पण केले जाणार आहे. ग्रहपीडा निवारण, संकटनिवारण करण्यासाठी तसेच इच्छित मनोकामना पूर्ण करण्यासाठी श्री व्यंकटेश स्तोत्र अतिशय प्रभावी मानले जाते. जाणून घेऊया सविस्तर...
श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी हे भगवान विष्णूचे अवतार मानले जाणारे, सुख-समृद्धी, धन-धान्य, ऐश्वर्य-वैभव आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक आहेत. व्यंकटेश स्तोत्र मंडळ हे भगवान श्री व्यंकटेश तिरुपती बालाजी देवाला प्रसन्न करण्यासाठी आणि आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी एक प्रभावी उपाय आहे. व्यंकटेश स्तोत्र एक अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे. अनेकांनी त्याचा अनुभव घेतला आहे. अर्थात ज्यांची श्रद्धा असते त्यांनाच अनुभव येतो असे म्हणतात. श्री व्यंकटेश स्तोत्राचा पाठ श्रद्धेने आणि एकाग्रतेने करणाऱ्या अनेकांना लाभ होतो. त्यांना श्री व्यंकटेश यांचे आशीर्वाद मिळतात आणि ते समृद्ध होतात. त्यांच्या जीवनातून दु:ख, संकटे निघून जातात, असेही म्हटले जाते.
श्री व्यंकटेश स्तोत्राबाबत माहिती आणि पारायण करायचे नियम
१. स्तोत्र मंडळ सुरू करण्यापूर्वी पहिल्या दिवशी आपली इच्छा आणि अडीअडचणी सांगून संकल्प करा.
२. एक मंडळ म्हणजे २१ वेळा या स्तोत्राचा पाठ म्हणणे.
३. हे स्तोत्र २१ दिवस (कोणताही दिवस, वार, पक्ष चालतो), रोज मध्यरात्री १२ वाजता (शुचिर्भूत होऊन), म्हणायला सुरुवात करावी, संपवावे आपल्या गतीने, हरकत नाही, पण सुरू मात्र ठीक १२ वाजता रात्री करावे.
४. या २१ दिवसांत काही गोष्टी जितक्या होऊ शकतील तितक्या टाळाव्या . काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर, ईर्ष्या, असत्य विचार, वर्तन, वचन, कोणावर अन्याय. मांसाहार आणि मद्यपान वर्ज्य!
५. रोज रात्री हे स्तोत्र म्हणताना पूर्व दिशेला तोंड करून निळ्या, आसनावर मांडी घालून बसावे.
६. इकडे-तिकडे न पाहाता, कोणाकडेही काहीही लक्ष न देता एकाग्रतेने म्हणावे अथवा वाचावे.
७. २१दिवस पूर्ण झाल्यावर जे काही इच्छित मनोकामना पूर्ण होते किंवा अडचणी दूर होण्याचे संकेत जरूर मिळतात असा या अनेकांचा अनुभव आहे.
८. २१ दिवसांची ही उपासना पार पाडताना कितीही विघ्ने आली तरी त्यावर मात करण्याची तयारी ठेवा. मोजून तीन मिनिटांचे हे स्तोत्र आहे. तेवढा वेळ अवश्य काढा कारण ग्रहपीडा निवारण, संकट निवारण करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी स्तोत्र आहे.
९. २१ दिवसांच्या कालावधीत उपवास ठेवणे स्तोत्र मंडळाचा फलप्राप्तीसाठी उपयुक्त आहे.
१०. २१ दिवसांमध्ये ब्रह्मचर्याचे पालन करणे आवश्यक आहे.
११. २१ दिवसांत २१ मंडळ पूर्ण करावे.
१२. सोयर, सुतक, मासिक धर्म आल्यास मंडळ थांबवा आणि पुन्हा नव्याने सुरुवात करा.
१३. स्तोत्र वाचनाच्या वेळी भगवान श्री व्यंकटेशाची मूर्ती, प्रतिमा किंवा चित्र समोर ठेवणे.
१४. भगवान श्री व्यंकटेश देवासमोर दिवा लावावा. फुलांची हार अर्पण करणे.
१५. स्तोत्राचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करणे.
१६. वाचनानंतर भगवंताचे आभार मानावे आणि पुढील इच्छा पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करावी.
१७. स्त्री-पुरुष दोघंही हे स्तोत्र वाचू शकतात. व्यंकटेश स्तोत्र मंडळाचे वाचन स्त्रियांसाठीही अत्यंत फलदायी मानले गेले आहे.
१८. मराठी किंवा संस्कृत भाषेत वाचू शकता. संस्कृतमधून वाचल्यास वेळ वाढण्याची भीती मनात ठेवू नये.
१९. स्तोत्र मंडळ करण्यापूर्वी योग्य तयारी करणे आणि नियम आणि पद्धतींचे पालन करणे आवश्यक आहे.
२०. स्तोत्र मंडळाच्या काळात शांत आणि सकारात्मक विचार करणे आणि नकारात्मक विचारांपासून दूर राहणे आवश्यक आहे.
२१. हा संकल्प करताना श्री व्यंकटेश देवावर संपूर्ण श्रद्धा आणि विश्वास ठेवणे अत्यावश्यक आहे.
श्री व्यंकटेश स्तोत्र
व्यंकटेशो वासुदेवः प्रद्युम्नोऽमितविक्रमः।
संकर्षणो अनिरुद्धश्र्च शेषाद्रिपतिरेवचः ॥१॥
जनार्दनः पद्मनामो वेंकटाचलवासिनः ।
सृष्टीकर्ता जगन्नाथो माधवो भक्तवत्सलः॥२॥
गोविंदो गोपतिः कृष्णः केशवो गरुडध्वजः ।
वराहो वामनश्चैव नारायण अधोक्षजः ॥३॥
श्रीधरः पुंडरिकाक्षः सर्वदेवस्तुतो हरीः ।
श्रीनृसिंहो महासिंहः सूत्राकारः पुरातनः ॥४॥
रमानाथो महाभर्ता मधुरः पुरुषोत्तमः ।
चोलपुत्रप्रियः शांतो ब्रह्मादिनां वरप्रदः ॥५॥
श्रीनिधिः सर्वभूतानां भयकृद् भयनाशनः ।
श्रीरामो रामभद्रश्च भवबंधैकमोचकः ॥६॥
भूतावासो गिरावासः श्रीनिवासः श्रियःपतिः
अच्युतानंद गोविंद विष्णुर्वेंकटनायकः ॥७॥
सर्वदेवैकशरणं सर्वदेवैकदैवतं ।
समस्तदेवकवचं सर्वदेवशिखामणिः ॥८॥
इतीदं कीर्तितं यस्य विष्णोरमिततेजसः ।
त्रिकाले यः पठेन्नित्यं पापं तस्य न विद्यते ॥९॥
राजद्वारे पठेद् घोरे संग्रामे रिपुसंकटे ।
भूत-सर्प-पिशाचादि भयं नास्ति कदाचन ॥१०॥
अपुत्रो लभते पुत्रान् निर्धनो धनवान्भवेत् ।
रोगार्ते मुच्यते रोगात् बद्धो मुच्येत बंधनात् ॥११॥
यद् यदिष्टतमं लोके तत् तत् प्राप्नोत्यसंशयः ।
ऐश्वर्यं राजसंन्मानं भुक्तिमुक्तिफलप्रदम् ॥१२॥
विष्णोर्लोकैकसोपानं सर्वदुःखैकनाशनं ।
सर्वऐश्वर्यप्रदं नृणां सर्वमंगलकारकम् ॥१३॥
मायावी परमानंद त्यक्त्वा वैकूठमुत्तमं ।
स्वामिपुष्करिणीतीरे रमया सह मोदते ॥१४॥
कल्याणाद्भूत गात्राय कामितार्थप्रदायिने ।
श्रीमद् वेंकटनाथाय श्रीनिवासाय ते नमः ॥१५॥
॥श्रीकृष्णार्पणमस्तु॥
- सदर माहिती सामान्य गृहीतके आणि मान्यतांवर आधारित असून, यासंदर्भात तज्ज्ञ व्यक्तींचा सल्ला घेणे उपयुक्त ठरू शकेल, असे सांगितले जात आहे.