शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
2
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
3
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
4
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
5
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
6
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
7
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
8
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
9
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
10
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
11
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
12
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
13
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
14
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
15
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
16
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
17
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
18
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
19
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
20
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
Daily Top 2Weekly Top 5

श्री रामदूताचा चमत्कार! २१ दिवस श्रद्धेने करा 'हा' उपाय आणि अनुभवा आयुष्यात सकारात्मक बदल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 21, 2026 15:44 IST

संकटमोचक हनुमान: झोपेतून उठल्यावर घ्या ही १२ नावे, २१ दिवसांत अनुभवाल सकारात्मक बदल; सूरवात कधी करावी तेही जाणून घ्या.

हनुमान हे कलियुगातील जागृत दैवत मानले जातात. संकटाच्या वेळी ज्यांचे नाव घेताच भीती पळून जाते, अशा महाबलाढ्य हनुमंताच्या १२ नामांचे विशेष महत्त्व शास्त्रात सांगितले आहे. ती बारा नावे कोणती? त्यामुळे कोणता लाभ होतो आणि ते किती दिवस घ्यायला हवे ते जाणून घेऊ. 

Astro Tip: तुळस अचानक वेगाने वाढण्यामागे दडलेत 'हे' शुभ संकेत; वाचा ज्योतिषशास्त्रातील थक्क करणारे खुलासे

आयुष्यात कधी कधी असे प्रसंग येतात जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात. अशा वेळी गरज असते ती एका दैवी शक्तीच्या आधाराची. प्रभू श्रीरामाचे परम भक्त आणि अष्टसिद्धी-नवनिधीचे दाते 'हनुमान' यांच्या नामात इतकी शक्ती आहे की, केवळ स्मरण केल्याने अशक्य गोष्टीही शक्य होतात.

आनंद रामायणात नमूद केल्यानुसार, हनुमंताची १२ नावे सकाळी उठल्यावर घेण्याने सर्व संकटांतून मुक्ती मिळते.

Karmayoga: ज्यांनी तुम्हाला रडवलंय, त्यांना काळ उत्तर देईल; वाचा भगवान श्रीकृष्णांनी सांगितलेला कर्मसिद्धांत!

हनुमंताची १२ प्रभावशाली नावे:

१. श्री हनुमते नमः (ज्याचे हनुवटी कापली गेली आहे असे)२. श्री अंजनिसुताय नमः (माता अंजनीचा पुत्र)३. श्री वायुपुत्राय नमः (पवनपुत्र)४. श्री महाबलाय नमः (अफाट शक्तीचा स्वामी)५. श्री रामेष्टाय नमः (प्रभू रामाचा प्रिय भक्त)६. श्री फाल्गुण सखाये नमः (अर्जुनाचा मित्र)७. श्री पिंगाक्षे नमः (ज्याचे डोळे सोनेरी-तांबूस आहेत)८. श्री अमितविक्रमे नमः (असीम पराक्रम गाजवणारा)९. श्री उदधि क्रमणे नमः (समुद्र ओलांडणारा)१०. श्री सीता शोक विनाशने नमः (माता सीतेचे दुःख दूर करणारा)११. श्री लक्ष्मण प्राणदात्रे नमः (लक्ष्मणाचे प्राण वाचवणारा)१२. श्री दशग्रीव दर्पहा नमः (रावणाचा अहंकार चक्काचूर करणारा)

२१ दिवसांचा संकल्प आणि त्याचे लाभ:

शास्त्रानुसार, जो कोणी रोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी या १२ नामांचे स्मरण करतो, त्याला खालील फळे प्राप्त होतात:

भयमुक्ती: मनातील भीती, भीतीदायक स्वप्ने आणि अज्ञात भीती दूर होते.

कार्यात यश: अडकलेली कामे मार्गी लागतात आणि बुद्धी तल्लख होते.

शारीरिक व्याधी: आरोग्य सुधारते आणि दीर्घायुष्य लाभते.

संकट निवारण: प्रवासात किंवा कोणत्याही कठीण प्रसंगात ही नावे कवच म्हणून काम करतात.

कसा करावा हा संकल्प?

रोज सकाळी अंथरुणातून उठल्याबरोबर, पाय जमिनीला टेकवण्यापूर्वी शांत मनाने ही १२ नावे म्हणावीत. हा संकल्प सलग २१ दिवस श्रद्धेने करा. श्रद्धेमध्ये डोंगर हलवण्याची शक्ती असते, आणि जिथे भक्ती असते तिथे हनुमान स्वतः रक्षणासाठी उभे राहतात. त्यामुळे शुभ क्षणाची वाट न पाहता हे शुभ कार्य त्वरित सुरु करा. 

English
हिंदी सारांश
Web Title : Miracle of Hanuman: 21-Day Prayer for Positive Life Changes

Web Summary : Chant Hanuman's 12 names daily for 21 days to overcome fear, gain success, improve health, and resolve problems. Start this auspicious practice immediately with faith for divine protection and positive transformation.
टॅग्स :Lord HanumanहनुमानPuja Vidhiपूजा विधीTraditional Ritualsपारंपारिक विधीspiritualअध्यात्मिक