शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
4
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
5
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
6
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
7
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
8
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
9
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
10
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
11
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
12
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
13
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
14
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
15
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
16
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
17
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
18
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
19
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
20
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...

माजलगाव तहसीलच्या आवारातील सेफ्टीक टॅंकमध्ये दुचाकीसह तरुण पडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 7:35 PM

तहसील परिसरात उपस्थित नागरिकांनी बचाव कार्य केले

माजलगाव : येथील तहसील कार्यालयाच्या पाठीमागील बाजूस असलेल्या फुटलेल्या ३० फूट खोल सेफ्टीक टॅंकमध्ये मोटरसायकलसह तरुण पडल्याची घटना सोमवारी घडली. दरम्यान, नागरिकांनी तात्काळ दोराच्या साहाय्याने मदतकार्य करून हरिभाऊ पंडित भारसावडे या तरुणाचे प्राण वाचवले. 

येथील तहसील कार्यालयाचे आवार मोठे व प्रशस्त असून या परिसरात दुय्यम निबंधक कार्यालय,भूमी अभिलेख कार्यालय आहे.याच बरोबर मोकळ्या जागेवर झाडेझुडपे प्रचंड वाढलेली आहेत. तहसील कार्यालयाकडून वाळु बेकायदेशीरपणे वाहतूक करणाऱ्या वाहनांवर कार्यवाही करण्यात येते. या कार्यवाहीसाठी टिप्पर, ट्रॅक्टर जेसीबी मशीन अशी पाच-पाच ब्रास वाळू भरलेली अवजड वाहने तहसील कार्यालयात आणण्यात येतात व ही वाहने पाठीमागील बाजूस असलेल्या दुय्यम निबंधक कार्यालयाला उभे केली जातात. मागील पाच दिवसांपूर्वी वाळूने खचाखच भरलेले टिप्पर या भागात आणले व ते टिप्पर तहसीलच्या सेफ्टीक टॅन्कवरून जाताच त्याचा स्लॅब आतमध्ये कोसळला. याबाबत दुय्यम निबंधक यांनी तात्काळ पत्र लिहून तहसील कार्यालयास कळवले,मात्र त्याची दखल घेतली गेली नाही.

दरम्यान, सोमवारी दुपारी दुय्यम निबंधक कार्यालयात हरिभाऊ पंडित भारसावडे हा दुचाकी ( एम एच ४४-एफ-६५१८ ) आला. तेथून जात असताना टॅंकचा स्लॅब पडलेला त्याला दिसले नाही व तो दुचाकीसह त्यात कोसळला.  त्यावेळी एकच गोंधळ उडाला, टॅंक मध्ये दुर्गंधीयुक्त घाणपाणी होते त्यात तो पडला. त्या मध्ये  मलबा असल्याने तो बुडाला नाही. तेथील नागरिकांनी तात्काळ दोर आणून त्याद्वारे तरुणास बाहेर काढून त्याचे प्राण वाचवले. हरिभाऊ यास किरकोळ जखम झाली असून दुचाकीचे नुकसान झाले आहे. 

टॅग्स :AccidentअपघातBeedबीडbikeबाईक