शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
2
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
3
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
4
Breaking: भाजपचे जोरदार धक्कातंत्र! उज्ज्वल निकमांना लोकसभेची उमेदवारी; पूनम महाजनांचे तिकीट कापले
5
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
6
जॅक नो Chill! २२ वर्षीय पोरानं मुंबईला पाणी पाजले; दिल्लीने उभी केली सर्वोच्च धावसंख्या 
7
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
8
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
9
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
10
हृदयद्रावक! ६ महिन्यांचा लेक पोरका झाला; भारतमातेच्या हुतात्मा सुपुत्राला अखेरचा निरोप
11
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
12
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...
13
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
14
ममता बॅनर्जी हेलिकॉप्टरमध्येच पडल्या, दोन वर्षांतली चौथी घटना
15
इंटिमेट सीन्समुळे अनेक चित्रपट गमावले, आईवडिलांची नव्हती परवानगी; मृणाल ठाकुरचा खुलासा
16
९ चौकार, ३ षटकार! २२ वर्षीय जॅक फ्रेझर-मॅकगर्कची वेगवान फिफ्टी; बुमराहलाही धू धू धुतले 
17
“अशोक चव्हाण मोठे नेते असते तर मोदी-शाहांनी नांदेडमध्ये सभा घेतली नसती”: बाळासाहेब थोरात
18
"तू बारामतीचा उमेदवार बदल, मी प्रचार करतो"; अजितदादांनी सांगितला श्रीनिवास पवारांचा किस्सा
19
मला का काढलं? Prithvi Shaw भर मैदानात रिकी पाँटिंगसोबत वाद घालताना दिसला
20
Sadguru Diet: सद्गुरू सांगताहेत बॅलेन्स डाएटचा कानमंत्र; वजन कमी होईल आणि नियंत्रितही राहील!

उच्च पदावरील व्यक्तींसह तरुण ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2019 5:02 PM

सोशल मीडियातून सावज शोधण्याचे गुन्हेगारांचे षडयंत्र

ठळक मुद्देखंडणीखोरांचा असाही फंडा अश्लील चित्रफित बनवून खंडणीची मागणी

- प्रभात बुडूख

बीड : सोशल मीडियाच्या माध्यमातून एखाद्या उच्चपदावरील व्यक्तीशी किंवा तरुणांशी शरीर सुखाचे प्रलोभन दाखवून जवळीक साधून त्यांनी केलेल्या कृत्याची व्हिडिओ रेकॉर्डिंग करून ब्लॅकमेल करून लाखों रुपये उकळण्याचे प्रकार घडत आहेत, याला ‘हनी ट्रॅप’ असे म्हणतात. या ट्रॅपच्या विळख्यात उच्च पदावर काम करणाऱ्या व्यक्ती व तरुणाई ओढली जात आहे. मात्र, समाजात आपली बदनामी होईल म्हणून असे प्रकार उघडकीस येत नाहीत. 

अशाच प्रकारे ‘हनी ट्रॅप’मध्ये गेवराई येथील एका महाविद्यालयातील प्राध्यापक अडकल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला होता. त्यांना २० लाख रुपयांची खंडणी मागितली होती. यावेळी ५ लाखांचा धनादेश व ५ तोळ््याची अंगठी देण्याचे कबूल केले होते. मात्र, त्यानंतर शिवाजीनगर पोलीस ठाण्यात प्राध्यापकाने तक्रार दिल्यामुळे या प्रकरणातील तीन पुरुष व दोन महिलांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र अशा प्रकारे ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात अडकवणारी टोळी जिल्हाभरात सक्रिय असल्याचा संशय पोलिसांमधून व्यक्त केला जात आहे. त्या दृष्टीने पोलिसांचा तपास सुरु आहे. 

‘हनी ट्रॅप’ करण्यासाठी सुरुवातीला एखाद्या महिलेच्या माध्यमातून सोशल मीडियाच्या माध्यमातून त्या व्यक्तीशी किंवा तरुणाशी संवाद साधला जातो. त्याला शारीरिक सुखाचे प्रलोभन देऊन आक र्षित केले जाते. त्यानंतर अश्लिल चॅटींग केली जाते. पुढील व्यक्ती किंवा तरुणाला आपल्या जाळ््यात ओढल्यानंतर त्याच्यासोबत एखाद्या लॉजवर किंवा इतर ठिकाणी बोलावून त्याच्यासोबत गैरकृत्य केले जाते. तो व्यक्ती शारीरीक सुखाच्या आहारी गेलेल असल्यामुळे आपले चित्रीकरण केले जात आहे, याची जाणीव देखील त्याला होत नाही. सर्व काही झाल्यानंतर काही दिवसांनी या टोळीमधील व्यक्ती संबंधिताकडे जाऊन व्हिडीओ रेकॉर्डिंग दाखवून लाखों रुपयांची मागणी केली जाते. पैसे न दिल्यास सोशल मीडियाच्या माध्यमातून क्लिप व्हायरल करण्याची धमकी देखील दिली जाते. त्यामुळे आपली बदनामी होईल, या भितीने निमूटपणे मागेल ती रक्कम दिली जाते व गुन्हा किंवा फिर्याद दाखल करण्यासाठी देखील कोणी पुढे येत नाही. त्यामुळे अशा प्रकारे ‘हनी ट्रॅप’ टाकणारे निर्ढावल्याने आपला गोरख धंदा सुरुच ठेवतात. दोन दिवसापुर्वी गेवराईत उघडकीस आलेल्या प्रकरणामुळे जिल्ह्यातील आणखी किती जणांना अशा प्रकारे गंडा घातला आहे. तसेच ‘हनी ट्रॅप’च्या विळख्यात अडकवणाऱ्या किती टोळ््या सक्रिय आहेत याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.

नग्न चित्रफित केली जाते तयार ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकलेल्या व्यक्तीला किंवा महाविद्यालयातील तरुणाला ती महिला एखाद्या अनोळखी ठिकाणी लॉजवर किंवा घरी बोलावते, त्यानंतर महिलेसोबत शय्यासोबत करतानाची  नग्न चित्रफित त्या व्यक्तीला न कळू देता बनवली जाते. तसेच हा गैरप्रकार सुरु असताना त्या टोळीतील संबंधित महिलेचा पती, भाऊ, किंवा नातेवाईक बनून अचानक घरी जातो व हे गैरकृत्य करताना रंगेहात पकडतो. हे सर्व ‘हनी ट्रॅप’मध्ये ठरलेले असते, त्यानंतर या सर्व पुराव्यांचा आधार घेऊन त्या व्यक्तिला बदनाम करु किंवा अत्याचाराचा गुन्हा दाखल करुन अशा प्रकारे धमकावून ब्लॅकमेल केले जाते व त्याच्याकडून लाखो रुपये उकळले जातात.

नीतिमूल्य जपल्यास असे प्रकार घडत नाहीत - कबाडे प्रत्येक व्यक्तीने आपले नितीमुल्य, समाजातील पत, प्रतिष्ठा जपणे गरजेचे आहे. अशा प्रकारे फसवणूक टाळण्यासाठी  फेसबूक किंवा इतर सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तींशी जवळीक साधू नये. तरी देखील अशा प्रकारे आपली फसवणूक झाली असेल तर तात्काळ पोलिसात फिर्याद दाखल करावी. योग्य तपास करुन कारवाई केली जाईल, अशी प्रतिक्रिया बीडचे अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे यांनी दिली आहे.  

टॅग्स :Policeपोलिसhoneytrapहनीट्रॅपCrime Newsगुन्हेगारीBeedबीड