गोठ्यात झोपलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2020 06:20 PM2020-06-23T18:20:25+5:302020-06-23T19:36:16+5:30

तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या

A young man sleeping in a shade was stabbed to death | गोठ्यात झोपलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

गोठ्यात झोपलेल्या तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या

Next
ठळक मुद्देआष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथील घटना

कडा  : शेतातील गोठ्यात झोपलेल्या एका तरूणाच्या तोंडावर आणि गळ्यावर  धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याची घटना पिंपरखेड येथे मंगळवारी सकाळी उघडकीस आली. रामदास पांडुरंग चव्हाण (३५ ) असे मृत तरूणाचे नाव आहे.

आष्टी तालुक्यातील पिंपरखेड येथील रामदास चव्हाण हा शेती करतो.  रामदास सोमवारी रात्री घरापासून जवळच असलेल्या शेतातील गोठ्यात झोपण्यासाठी गेला होता. आज सकाळी रामदासचे वडिल शेतात गेले असता त्यांना गोठ्यात रामदास रक्ताच्या थारोळ्यात पडलेला दिसून आला. घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक विजय कबाडे, उपविभागीय पोलीस अधिकारी विजय लगारे, सहायक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर कुकलारे यांनी घटनास्थळी भेट दिली. आरोपींनी रामदास याच्या तोंडावर आणि गळ्यावर धारदार शस्त्राने वार केल्याचे निदर्शनास आले. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

दोन आठवड्यात खुनाची दुसरी घटना
९ जून रोजी तालुक्यातील कानडी येथील तरुणाच्या खुनाची घटना घडली होती. या घटनेला चौदा दिवस होत नाही तोच पिंपरखेड येथील तरूणाचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. तालुक्यात वाढती गुन्हेगारी रोखण्याचे आव्हान पोलीस यंत्रणेसमोर आहे.

Web Title: A young man sleeping in a shade was stabbed to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.