ग्रुपस्टडीसाठी घरी आलेल्या बहिणीच्या मैत्रिणीवर तरुणाचा अत्याचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 16:14 IST2020-07-13T16:10:55+5:302020-07-13T16:14:50+5:30

जीवे मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर केला अत्याचार

Young man rapes sister's friend who came home for group study | ग्रुपस्टडीसाठी घरी आलेल्या बहिणीच्या मैत्रिणीवर तरुणाचा अत्याचार

ग्रुपस्टडीसाठी घरी आलेल्या बहिणीच्या मैत्रिणीवर तरुणाचा अत्याचार

ठळक मुद्देअंबाजोगाई तालुक्यातील घटनापीडिता गर्भवती राहिल्याने घटना उघडकीस

अंबाजोगाई : मैत्रिणीच्या घरी अभ्यासाला गेलेल्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तरुणाने अत्याचार केला. पिडीत मुलगी गर्भवती राहिल्याने हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणावर बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. ही घटना अंबाजोगाई तालुक्यात घडली.
 
या अत्याचाराबाबत पिडीतेने अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात तक्रार दिली आहे. तिने नमूद केले आहे कि सात ते आठ महिन्यापूर्वी ती तिच्या मैत्रिणीकडे अभ्यासाला गेली होती. यावेळी घरात कोणी नसल्याची संधी साधत मैत्रिणीच्या भावाने तिच्यावर अत्याचार केला. या प्रकरणाची कुठे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी देखील त्याने दिली. त्यामुळे जीवाच्या भीतीने पीडिता शांत राहिली. दरम्यान, रविवारी (दि. १२ जुलै) तिचे पोट दुखू लागल्याने तिला स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. 

तपासणीतून ती गर्भवती असल्याचे उघड झाल्याने तिच्यावरील अत्याचाराला वाचा फुटली. पिडीतेच्या तक्रारीवरून गोविंद इंगळे या तरुणावर अंबाजोगाई ग्रामीण ठाण्यात पोक्सो आणि बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरिक्षक मोनाली पवार करत आहेत. दरम्यान, गुन्हा दाखल होताच आरोपी फरार झाला असून त्याचा शोध सुरु आहे.

Web Title: Young man rapes sister's friend who came home for group study