आडस शिवारात शेततळ्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:23 IST2021-07-01T04:23:40+5:302021-07-01T04:23:40+5:30

तालुक्यातील आडस शिवारात असणाऱ्या कळमआंबा रस्त्यावरील सर्व्हे नंबर २२२/४ मधील आपल्या शेतात शेततळ्यातील पाइपलाइनचे झाकण लावण्यासाठी मोरेश्वर हा गेला ...

Young man dies after falling in a field in Adas Shivara | आडस शिवारात शेततळ्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

आडस शिवारात शेततळ्यात पडल्याने तरुणाचा मृत्यू

तालुक्यातील आडस शिवारात असणाऱ्या कळमआंबा रस्त्यावरील सर्व्हे नंबर २२२/४ मधील आपल्या शेतात शेततळ्यातील पाइपलाइनचे झाकण लावण्यासाठी मोरेश्वर हा गेला होता. झाकण लावताना त्याचा तोल गेल्याने तो शेततळ्यातील पाण्यात पडला. त्यास पोहता येत नसल्याने तो पाण्यात बुडाला. ही घटना जवळच शेतात काम करणाऱ्या शेतगड्यांच्या निदर्शनास आल्याने त्यांनी त्यास वाचविण्याचा प्रयत्न केला असता तो लवकर आढळून आला नाही. तोपर्यंत घटनेची माहिती समजताच शेजारी असलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीने मृतदेह पाण्याबाहेर काढण्यात आला. घटनेची माहिती पोलिसांना देताच पोलीस शिपाई तेजस वाव्हळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयात पाठविला आहे.

मृत तरुण हा पुण्यातील महाविद्यालयात वाणिज्य शाळेच्या अंतिम वर्षात शिक्षण घेत होता. कोरोनाच्या काळात महाविद्यालय बंद असल्याने तो मागील दीड वर्षापासून गावी शेतावर आई-वडिलांसोबत राहत होता. एकुलता एक असणाऱ्या मुलाच्या अपघाती मृत्यूने आईने फोडलेला हंबरडा हा उपस्थितांचे मन हेलावून टाकणारा होता.

Web Title: Young man dies after falling in a field in Adas Shivara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.