शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

तू पसंत नाहीस! पतीचा झोपेतच आवळला गळा, मेहंदीचे रंग उडण्याआधीच नवविवाहितेचे कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2022 16:10 IST

तीन आठवड्यापूर्वी झाले होते लग्न, खून केल्यानंतर ओरडत आली पत्नी बाहेर

गेवराई (जि. बीड) : अवघ्या तीन आठवड्यांपूर्वी लग्न झालेले. हातावरील मेहंदीचे रंग ताजे होते. मात्र, सुखी संसाराची स्वप्नं रंगवत झोपी गेलेल्या पतीचा पत्नीने गळा दाबून खून केला. पती पसंत नसल्याने तिने हे पाऊल उचलल्याचा आरोप असून, पोलिसांनी तिला अटक केली आहे. तालुक्यातील निपाणी जवळका तांडा येथे ७ नोव्हेंबर रोजी घडलेल्या या घटनेने तालुका सुन्न झाला आहे.

पांडुरंग राजाभाऊ चव्हाण (वय २४, रा. निपाणी जवळका तांडा, ता. गेवराई) असे मृताचे नाव आहे. त्याची आई नीलाबाई राजाभाऊ चव्हाण यांच्या फिर्यादीनुसार, त्या पती, दोन मुलांसह राहतात. मुलीचे लग्न झालेले असून, ती सासरी नांदते. १४ ऑक्टोबर २०२२ रोजी त्यांचा मुलगा पांडुरंग याचा विवाह पौळाचीवाडी (ता. गेवराई) येथील शीतल बंडू जाधवशी झाला होता. लग्नानंतर ती सासरी नांदण्यास आली. ७ नोव्हेंबरला रात्री ८ वाजता सर्वांनी सोबत जेवण केले. त्यानंतर रात्री ९ वाजता शीतल व पांडुरंग हे आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेले. रात्री साडेदहा वाजता शीतल ओरडत खोलीबाहेर आली. तुमच्या लेकाला काही तरी झाले आहे... ते बोलत नाहीत.. असे ती म्हणत हाेती.

यावेळी नीलाबाई व राजाभाऊ यांनी आत जाऊन् पाहिले असता पांडुरंग बेशुद्ध होता. त्यास तातडीने गेवराई उपजिल्हा रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून मृत घोषित केले. त्याच्या गळ्यावर व्रण होते. त्यावरून त्याचा घातपात झाल्याचा संशय सासरच्यांनी व्यक्त केला. उत्तरीय तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी पांडुरंगवर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, नीलाबाई यांनी सून शीतल विरुद्ध गेवराई ठाण्यात फिर्याद दिली. त्यावरून शीतल चव्हाणवर खुनाचा गुन्हा नोंदविण्यात आला.

प्रेम प्रकरणाची किनारलग्न झाल्यापासून शीतल नाराज होती. पांडुरंगला ती तू पसंत नाहीस, मला आवडत नाहीस, असे म्हणून राग व्यक्त करत होती. माझे तुझ्यावर प्रेम नाही, तर दुसऱ्या कोणावर तरी प्रेम आहे, असे ती एकवेळा म्हटली होती, असे नीलाबाई यांनी फिर्यादीत नमूद केले आहे. प्रेम प्रकरणातून तिने हे पाऊल उचलल्याचा अंदाज असून, त्यादृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

तीन दिवसांची पोलीस कोठडीदरम्यान, १२ नोव्हेंबरला गुन्हा नोंद झाल्यावर दि. १३ रोजी गेवराई पोलिसांनी आरोपी शीतल पांडुरंग चव्हाणला ताब्यात घेतले. तिला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली, अशी माहिती सहायक निरीक्षक प्रफुल्ल साबळे यांनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBeedबीडmarriageलग्न