योगेश्वरी नूतनच्या माजी विद्यार्थ्यांची कोविड सेंटरला मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:31+5:302021-05-24T04:31:31+5:30
अंबाजोगाई : येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून वर्गणी जमा केली. जमलेल्या पैशातून लोखंडी सावरगाव ...

योगेश्वरी नूतनच्या माजी विद्यार्थ्यांची कोविड सेंटरला मदत
अंबाजोगाई : येथील योगेश्वरी नूतन विद्यालयातील माजी विद्यार्थ्यांनी एकमेकांशी संपर्क साधून वर्गणी जमा केली. जमलेल्या पैशातून लोखंडी सावरगाव येथील कोविड सेंटरला रुग्णांसाठी आवश्यक वस्तू भेट दिल्या. १९९९ साली इयत्ता दहावीत असलेल्या वर्गमित्रांनी पाच वर्षांपूर्वी सोशल मीडियावर ग्रुप तयार केला. यामध्ये जवळपास दीडशे वर्गमित्र जोडले गेले. सर्व मित्रांचा एक मेळावा मागील वर्षात झाला होता. त्यातच हे कोरोनाचे संकट जगावर आले. जेथे शिक्षण घेतले त्या संस्थेची प्रेरणा घेत सर्व वर्गमित्रांनी जवळपास ५१ हजार २०० एक रुपये जमा केले. यामध्ये परदेशात असणाऱ्या काही मित्रांनीसुद्धा मदत केली. २० मे रोजी तालुक्यातील लोखंडी सावरगाव येथील स्त्री रुग्णालय आणि वृद्धत्व व मानसिक आजार केंद्र इमारतीमधील दोन्ही कोविड केअर सेंटरला आवश्यक वस्तू भेट दिल्या. त्यात दोन रेफ्रिजरेटर, तीन ऑफिस टेबल, दहा खुर्च्या, सलाईन साडेआठशे बॉटल, सिरिंज एक हजार, अडीचशे इंजेक्शनचा समावेश होता.
हे सर्व साहित्य सामाजिक बांधीलकी म्हणून मदत स्वरूपात डॉ. अरुणा दहिफळे (केंद्रे ) व डॉ. चंद्रकांत चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले.
===Photopath===
220521\3203avinash mudegaonkar_img-20210521-wa0079_14.jpg