कडा येथील हजरत मौलाली बाबांची यात्रा रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:32 IST2021-05-24T04:32:15+5:302021-05-24T04:32:15+5:30
यावर्षी २६ व २७ मे रोजी हा उत्सव होणार होता. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द करावी लागली आहे. ...

कडा येथील हजरत मौलाली बाबांची यात्रा रद्द
यावर्षी २६ व २७ मे रोजी हा उत्सव होणार होता. कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षीही यात्रा रद्द करावी लागली आहे.
कडा येथे मौलाली बाबांचा उत्सव दरवर्षी बुद्धपौर्णिमेला मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या उत्सवास किमान एक लाखापेक्षा जास्त भाविकांची गर्दी असते. कडा व आसपासच्या गावातील परजिल्ह्यात, परराज्यात गेलेले सर्व कडेकर यात्रोत्सवास हमखास हजेरी लावून ग्रामदैवताचे मनोभावे दर्शन घेतात. परंतु यावर्षीही कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गावांमध्ये शांतता कमिटीची बैठक होऊन त्यामध्ये सदरील यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या शंभर वर्षात यात्रा रद्द होण्याची ही दुसरी वेळ असल्याने अनेक भाविकांच्या श्रद्धेवर विरजण पडले आहे. यंदा घरातूनच हजरत मौलाली बाबांचे दर्शन घेण्याचे आवाहन सरपंच अनिल ढोबळे, उपसरपंच संपत कर्डिले, ग्रामपंचायत सदस्य, यात्रा उत्सव कमिटीने केले आहे.
===Photopath===
230521\nitin kmble_img-20210523-wa0028_14.jpg
===Caption===
कडा येथील हजरत मौलाली बाबा दर्गा.