सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्यावतीने शहरातील सिद्धेश्वर संस्थानवर आयोजित केलेला कुस्त्यांचा कार्यक्रम रद्द करण्यात आला असल्याची माहिती आयोजक पहिलवान माउली पानसंबळ यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता, हा निर्णय घेतला असल्याचे आयोजकांनी कळविले असून, या स्पर्धेसाठी निमंत्रण दिलेल्या राज्यातील सर्व पहिलवान आणि वस्ताद यांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहनदेखील करण्यात आले आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महारथी कर्ण क्रीडा व्यायाम शाळा यांच्यावतीने शहरात राज्यस्तरीय पहिलवानांच्या जंगी कुस्त्यांचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेला राजकीय नेते, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार होते; परंतु कोरोनाचा वाढता प्रसार आणि शासनाने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून हा कार्यक्रम रद्द केला असल्याचे माउली पानसंबळ यांच्यासह अंकुश नेटके, महेश औसरमल, दिलीप माने, अशोक इंगळे, विनोद पवार, सय्यद पठाण, बाळू गायकवाड, युवराज बर्डे, शब्बीर पठाण, भागवत बारगजे, संतोष कांबळे यांनी केले आहे.