मजुरांना काम द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:23 IST2021-07-20T04:23:22+5:302021-07-20T04:23:22+5:30

गुटखा, दारू विक्री माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री ...

Workers should be given work | मजुरांना काम द्यावे

मजुरांना काम द्यावे

गुटखा, दारू विक्री

माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखाबंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांच्या संसारात कलह वाढत चालले आहेत.

इलेक्ट्रिक साहित्य चोरी

अंबाजोगाई : तालुक्यात सध्या शेतातील उसाला पाणी देणे सुरू आहे. मांजरा धरणाच्या डाव्या कालव्यांतून शेतीला पाणी सोडण्यात आले होते. विद्युतपंप चालवण्यासाठी केबल अंथरण्यात आले होते. या केबलची मोठ्या प्रमाणात चोरी होत आहे.

खड्ड्यांचा त्रास वाढला

अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव, अशा अनेक रस्त्यांवर पडलेल्या त्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना मोठी अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.

गतिरोधक उभारावेत

बीड : शहरातील मुख्य रस्त्यावर असलेल्या गतिरोधकाची दुरवस्था झाली आहे. अनेक वेळा या सपाट झालेल्या गतिरोधकामुळे वाहनांच्या गतीला आवरता येत नसून, वाहनधारक सुसाट वेगाने वाहन चालवून धोका निर्माण करीत आहेत.

Web Title: Workers should be given work