मजुरांना काम द्यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:22 IST2021-07-09T04:22:10+5:302021-07-09T04:22:10+5:30
खड्ड्यांचा त्रास वाढला अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते ...

मजुरांना काम द्यावे
खड्ड्यांचा त्रास वाढला
अंबाजोगाई : तालुक्यातील ग्रामीण भागात रस्त्यांवर मोठमोठे खड्डे पडले आहेत. अंबाजोगाई ते देवळा व अंबासाखर ते धानोरा, राडी ते मुडेगाव. अशा अनेक रस्त्यावर पडलेल्या त्या खड्ड्यांमुळे दुचाकी व चारचाकी वाहन चालवताना अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते.
पाण्याची नासाडी
बीड : शहरात अनेक भागात पाणी मुबलक प्रमाणात मिळत आहे. उन्हाळ्यातही पाणी टंचाई भासत नाही. त्याची नागरिकांना किंमत नसल्यासारखे झाले आहे. ज्यावेळी पाणीपुरवठा सुरू असतो. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे.
मास्कची सक्ती करावी
बीड : सध्या कोरोनामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. प्रशासन योग्य निर्णय घेत असले तरी त्याची अंमलबजावणी होत नाही. एकीकडे रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. हे लोक दुसऱ्यांना अडचणीत आणत आहेत. मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाईची मागणी होत आहे.
गुटखा, दारू विक्री
माजलगाव : टाकरवण परिसरात सध्या अवैध दारू विक्री सर्रासपणे सुरू आहे. गुटखा बंदी असूनही गावात गुटखा विक्री सर्रास सुरू आहे. तसेच अवैध दारू विक्रीही बोकाळली आहे. दारूच्या व्यसनाने अनेकांच्या संसारात कलह वाढत चालले आहेत.