पावसामुळे जिर्ण झालेली भिंत अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2021 19:29 IST2021-09-06T19:28:54+5:302021-09-06T19:29:17+5:30
भिंतीच्या दगडाखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

पावसामुळे जिर्ण झालेली भिंत अंगावर कोसळून महिलेचा मृत्यू
गेवराई : तालुक्यातील सिरसदेवी येथे राहणा-या एका 65 वर्षीय महिलेच्या अंगावर घराची भिंत कोसळली. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. राधाबाई मिसाळ असे मृत्यू झालेल्या महिलेचे नावं आहे.
राधाबाई मिसाळ सिरसदेवी येथे मातीच्या घरात एकट्याच राहत होत्या. त्या रविवार नेहमी प्रमाणे जेवण करून आपल्या घरात झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास अचानक पावसामुळे जीर्ण झालेली भिंत राधाबाई यांच्या अंगावर कोसळली. भिंतीच्या दगडाखाली दबल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सरपंच रवींद्र गाडे,ग्रामसेवक देवकर, मंडळाधिकारी खेडकर, तलाठी व बीट जमादार श्याम तोडे यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.