सासरच्या त्रासाला कंटाळून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2020 15:26 IST2020-07-28T15:18:55+5:302020-07-28T15:26:11+5:30

सासरच्या जाचास कंटाळून आत्महत्या केल्याचा नातेवाईकांचा आरोप

Woman commits suicide with two-year-old boy | सासरच्या त्रासाला कंटाळून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

सासरच्या त्रासाला कंटाळून दोन वर्षांच्या चिमुकल्यासह महिलेची आत्महत्या

ठळक मुद्देपतीसह सासरचे मंडळी फरार झाले आहेत.

बीड :  सासरच्या मंडळीकडून होणार्‍या सततच्या जाचास कंटाळून एका विवाहितेने दोन वर्षांच्या चिमुकल्यासह आत्महत्या केली. ही घटना शिरुर तालुक्यातील फुलसांगवी येथे मंगळवारी (दि. २८ ) सकाळी घडली. रेखा भद्रीनाथ तळेकर ( २३, रा.फुलसांगवी ता.शिरुर) व संकेत भद्रीनाथ तळेकर ( ३ ) अशी मृतांची नावे आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

रेखा यांचा पाच वर्षापूर्वी भद्रीनाथ तळेकर यांच्याशी विवाह झाला होता. पतीसह सासरच्या मंडळीकडून त्यांना सतत त्रास होत असे. याला कंटाळून रेखा यांनी दोन वर्षांच्या चिमुकल्यासह विहिरीत उडी घेवून आत्महत्या केल्याचा आरोप माहेरच्या नातेवाईकांनी केला आहे. घटनेची माहिती मिळताच चकलंबा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरम्यान, पतीसह सासरचे मंडळी फरार झाले असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Woman commits suicide with two-year-old boy