कडा (जि. बीड) : पतीच्या निधनाचा विरह सहन न झाल्याने एका २२ वर्षीय विवाहितेने तान्ह्या बाळाला घरी सोडून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आष्टी तालुक्यातील खिळद येथे गुरुवारी सकाळी समोर आली आहे. स्वाती नंदू नागरगोजे-गर्जे असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. घुगेवाडी (ता. पाटोदा) येथील नंदू नागरगोजे यांचा विवाह काही महिन्यांपूर्वी खिळद (ता. आष्टी) येथील स्वाती गर्जे यांच्यासोबत झाला होता.
पतीच्या विरहाने पत्नीची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2025 06:22 IST