सरकारी अहवाल भरताना अंगणवाडीताईंची दमछाक, मोबाईल होऊ लागले हँग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:46 IST2021-01-08T05:46:56+5:302021-01-08T05:46:56+5:30
अंगणवाडीसेविकांनी मोबाईल काळजीपूर्वक हाताळावे, तांत्रिक अडचणी आल्यास गटसमन्वयकांशी संपर्क साधावा, इतर ॲप डाऊनलोड केले नाही व मेमरी नियंत्रणात ...

सरकारी अहवाल भरताना अंगणवाडीताईंची दमछाक, मोबाईल होऊ लागले हँग
अंगणवाडीसेविकांनी मोबाईल काळजीपूर्वक हाताळावे, तांत्रिक अडचणी आल्यास गटसमन्वयकांशी संपर्क साधावा, इतर ॲप डाऊनलोड केले नाही व मेमरी नियंत्रणात ठेवली तर मोबाईल हँग होणार नाहीत.
- रामेश्वर मुंडे, प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी, महिला बालकल्याण विभाग, जि. प. , बीड.
तीन महिन्यांपासून कॅस सिस्टीमचे सर्व्हर बंद आहे. त्यामुळे अंगणवाडीसेविकांना पर्यायी रजिस्टर वापरून संकलित केलेली माहिती तांत्रिक अडचणींमुळे रॅपिड रिपोर्टींग सिस्टीमद्वारे पर्यवेक्षिकांमार्फत कॅस प्रणालींतर्गत नोंद केली जात आहे. या पध्दतीने माहिती नोंदविण्याचे प्रमाण ८२ टक्के आहे.
मोबाईल नेटवर्कची अडचण आहे. अनेकदा माहिती अपलोड होत नाही. ऑफलाईन् भरलीतरी रेंज मिळाल्यानंतरच माहिती अपलोड होते. रेंज मिळविण्यासाठी पायपीट करावी लागते.
लसीकरण, बालकांच्या वर्गीकरणनिहाय दैनंदिन नोंदी, स्तनदामाता, गृहभेटी, गरोदरमाता, मुलींच्या आरोग्याच्या नोंदी, संदर्भ सेवा तसेच कुपोषित बालकांचे वजन मोजून श्रेणी निर्धारित करणे. गृहभेटीत आरोग्यविषयक सूचना द्याव्या लागतात.
सेविकेच्या रिक्त जागा असलेल्या अंगणवाडीअंतर्गत कार्यरत सेविकांना काम करावे लागते. दुहेरी कामामुळे बोजा वाढतो. मर्यादाही येतात.
जिल्ह्यातील अंगणवाडी : २९५७
अंगणवाडीसेविका २७१८
मोबाईल २७१८