कोविशिल्डचा पहिला डोस झाला, दुसरा केव्हा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:22 AM2021-06-20T04:22:42+5:302021-06-20T04:22:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अंबाजोगाई : कोरोना प्रतिबंधासाठी पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लसीकरण झाल्यानंतर १८ ते ...

When was the first dose of Covishield, the second? | कोविशिल्डचा पहिला डोस झाला, दुसरा केव्हा?

कोविशिल्डचा पहिला डोस झाला, दुसरा केव्हा?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

अंबाजोगाई : कोरोना प्रतिबंधासाठी पहिल्या टप्प्यात हेल्थ केअर वर्कर आणि फ्रंटलाईन वर्कर्संना लसीकरण झाल्यानंतर १८ ते ६० वयोगटातील नागरिकांना कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसींचे डोस देण्याचे नियोजन शासनाने केले आहे. परंतु लसीच्या अनियमित पुरवठ्यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस होऊन तीन महिन्यांपेक्षा अधिक कालावधी लोटूनही दुसरा डोस देण्यात आला नाही. त्यामुळे पहिला डोस घेणाऱ्या नागरिकांनी कोविशिल्डचा दुसरा डोस केव्हा? असा प्रश्न उपस्थित केला आहे.

अंबाजोगाई तालुक्यातील सहा प्राथमिक आरोग्य केंद्रांत व स्वाराती रुग्णालयात ४५ ते ६० वर्षे वयोगटातील नागरिकांसोबतच १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींच्या लसीकरणाची मोहीम राबविण्यात आली आहे. यात कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा नियमित केला जात आहे. कोविशिल्ड लसीचा पुरवठा सातत्याने होत नाही. यामुळे कोविशिल्डचा पहिला डोस घेतलेल्या नागरिकांना तीन महिन्यांचा कालावधी लोटला असून, ते दुसऱ्या डोसच्या प्रतीक्षेत आहेत.

कोरोना प्रतिबंधासाठी लस घेणे हे महत्त्वाचे आहे. याची नागरिकांमध्ये जागृती झाली असून, लसीकरण सुरू होताच लसीकरण केंद्रांवर मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसून येत आहे. परंतु शासनाकडून लसीच्या पुरवठ्यामध्ये सातत्य नसल्यामुळे परिसरातील अनेक नागरिक कोविशिल्डच्या दुसऱ्या डोसची वाट बघत आहेत. कोव्हॅक्सिनचे डोस उपलब्ध असून, कोविशिल्ड लसीचा पुरवठा अनियिमित होत असल्याने कोविशिल्डचा दुसरा डोस केव्हा मिळणार? असा सवाल नागरिकांनी केला आहे.

यासंदर्भात अंबाजोगाईचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बालासाहेब लोमटे यांच्याकडे विचारणा केली असता, डोसच्या उपलब्धतेनुसार लसीकरण सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: When was the first dose of Covishield, the second?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.