ट्रँक्टर उलटल्याने उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2021 18:19 IST2021-01-14T18:18:12+5:302021-01-14T18:19:28+5:30
शहरापासून जवळच परभणी रोडवर हा अपघात घडला.

ट्रँक्टर उलटल्याने उसाखाली दबून २५ मेंढ्या दगावल्या
माजलगाव : जयमहेश साखर कारखान्याकडे जाणारे एक ट्रँक्टर अचानक उलटल्याने त्यातील उसाखाली दबून २० ते २५ मेंढ्या दगावल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजता घडली. शहरापासून जवळच परभणी रोडवर हा अपघात घडला.
याबाबत अधिक माहिती अशी की, माजलगाव शहराकडून जय महेश कारखान्याकडे एक डबल ट्रॉलीचे ट्रॅक्टर ऊस घेऊन जात होते. परभणी रोडवर हे ट्रॅक्टर अचानक उलटले. यावेळी रस्त्याच्या बाजूने माजलगावकडे जाणाऱ्या २० ते २५ मेंढ्यां ट्रॅक्टरखाली दबल्या गेल्या. अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी दबलेल्या मेंढ्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाला होता. २० ते २५ मेंढ्या एकाचवेळी दगावल्याने मेंढपाळाचे मोठे नुकसान झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.