गडावर खोटे बोलणाऱ्यांना घडली अद्दल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2020 12:15 AM2020-01-10T00:15:28+5:302020-01-10T00:15:50+5:30

बीड : नारायणगडाच्या विकासासाठी विकास आराखडा मंजूर झाल्याचे मला समजले, मात्र त्यातील कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. ही कामे ...

What happened to the liars on the fort | गडावर खोटे बोलणाऱ्यांना घडली अद्दल

गडावर खोटे बोलणाऱ्यांना घडली अद्दल

Next
ठळक मुद्देधनंजय मुंडे : बोलण्यापेक्षा मी कृतीतूनच बीड जिल्ह्याचा करणार विकास; नाव न घेता पंकजा मुंडेंना लगावलाच टोला

बीड : नारायणगडाच्या विकासासाठी विकास आराखडा मंजूर झाल्याचे मला समजले, मात्र त्यातील कामे अद्यापही पूर्ण झालेली नाहीत. ही कामे ज्यांना पूर्ण करता आली नाहीत, त्यांना त्याचे फळ भोगावे लागले आहे . मात्र मी हा विकास आराखडा पूर्ण करीलच. त्याशिवाय आणखी काही वेगळी आणि चांगली कामे करता येतील का यासाठीही माझा विशेष प्रयत्न असेल. बोलण्यापेक्षा कृतीतून मी ते सिद्ध करून दाखवेल. गडावर खोटे बोलणाऱ्यांचे काय होते हे आपण सर्वांनी पाहिले आहे, अशा शब्दात जिल्ह्याचे पालकमंत्री, सामाजिक न्याय खात्याचे मंत्री धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांचे नाव न घेता टोला लगावला.
पालकमंत्रीपदाची जबाबदारी मिळाल्यानंतर प्रथमच आपल्या बीड जिल्ह्याच्या दौºयावर आलेल्या धनंजय मुंडे यांनी आपल्या दौºयाची सुरु वात श्री क्षेत्र नारायण गड येथे जाऊन दर्शनाने केली. महंत शिवाजी महाराज यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांच्या समवेत आ.प्रकाश सोळंके, आ. बाळासाहेब आजबे, आ. संदीप क्षीरसागर, अमरसिंह पंडित आणि जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
गडावर आल्यानंतर राजकीय भाषण करायचे नाही, हे संस्कार आपल्यावर झालेले आहेत. त्यामुळे आज या ठिकाणी कोणतेही राजकीय भाष्य करण्यासाठी मी आलेलो नाही तर नवीन जबाबदारी मिळाल्यानंतर शक्ती आणि ऊर्जा मिळावी यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे, असे मुंडे म्हणाले.
प्रास्ताविकात आ.संदीप क्षीरसागर यांनी धनंजय मुंडे यांचे आपल्या मतदारसंघामध्ये उत्स्फूर्तपणे स्वागत करताना त्यांच्याकडून जिल्ह्याच्या विकासाच्या अपेक्षा व्यक्त केल्या.
धनंजय मुंडे यांचा परळीमध्ये आज नागरी सत्कार
सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचा परळीत नागरी सत्कार सोहळा १० जानेवारी रोजी होणार आहे. विजयी मिरवणूक काढण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी अनेक आमदार, जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांसह विविध पक्षांचे नेते, पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या सोहळ्यात सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांच्यासह जिल्ह्यÞातील नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा गौरव करण्यात येणार आहे.

Web Title: What happened to the liars on the fort

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.