What to do if the patient's injuries are stopped near the hospital? | दवाखान्याजवळ रुग्णाचे ठोके बंद पडले तर काय करायचे?
दवाखान्याजवळ रुग्णाचे ठोके बंद पडले तर काय करायचे?

लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : दवाखान्यांमध्ये अथवा दवाखान्याबाहेर एखादा व्यक्ती अचानक कोसळली व त्याचे हृदय व श्वास बंद झाला, तर त्याच्या छातीवर शास्त्रोक्त पद्धतीने दाब देऊन त्याचे जीवन वाचवण्यासाठी कसे प्रयत्न करायचे याचे शास्त्रोक्त जीवन संजीवनी प्रक्रि या प्रशिक्षण शहरातील ७० परिचारिका आणि कंपाउंडर यांना रविवारी देण्यात आले.
जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून इंडियन मेडिकल असोसिएशनच्या बीड शाखेच्या वतीने शहरातील या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी खाजगी रुग्णालयात काम करणाऱ्या परिचारिका व कंपाउंडरचा पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. रुग्ण सेवेतील सहभागाबद्दल प्रशंसा करण्यात आली.
आयएमए हॉलमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आयएमएचे अध्यक्ष डॉ. अनिल बारकुल उपस्थित होते. डॉ. बारकुल यांच्यासह इंडियन सोसायटी आॅफ अनास्थेशियोलॉजीचे डॉ. मुकुंद पैठणकर, डॉ. रश्मी पैठणकर, डॉ. स्वप्नजा देशमुख, डॉ. सुनिता बारकुल यांनी प्रशिक्षण दिले. लहान मुलांबाबत डॉ. सचिन जेथलिया यांनी सविस्तर माहिती दिली. सूत्रसंचालन आयएमए उपाध्यक्ष डॉक्टर अनुराग पांगरीकर यांनी केले. हा कार्यक्र म यशस्वी करण्यासाठी वुमन्स विंगच्या अध्यक्ष डॉ. प्रज्ञा तांबडे, उपाध्यक्षा डॉ. शुभदा पांगरीकर यांनी विशेष प्रयत्न केले. आयएमएचे सचिव डॉ. विनोद ओस्तवाल यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते.
कार्यक्रमात एका परिचारिकेबरोबर आलेल्या पाच वर्षांच्या श्रीनिधीला ‘आज तू काय शिकली?’, असा प्रश्न विचारला असता तिने जीवन संजीवनी प्रणाली प्रक्रिया कशी द्यायची हे व्यविस्थत करून दाखवले. यावेळी आमच्या आयुष्यात आम्ही एखादी व्यक्ती जरी अशाप्रकारे जीवन संजीवनी प्रतिक्रि या देऊन वाचवू शकलो तर आमच्या नर्सिंग आयुष्याचे सार्थक झाले असे वाटेल अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थित प्रशिक्षणार्थींनी दिली. या प्रशिक्षणाचा फायदा झाल्याचेही त्यांनी सांगितले.


Web Title: What to do if the patient's injuries are stopped near the hospital?
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.