२९ फेब्रुवारीच्या ३२ लकी बॉय तर २३ लकी गर्लचे स्वागत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 29, 2020 11:50 PM2020-02-29T23:50:09+5:302020-02-29T23:51:18+5:30

बीड : इंग्रजी वर्षानुसार दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षाची चर्चा होत असते. या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस ...

Welcome to 1 Lucky Boy and 1 Lucky Girl on February 19th | २९ फेब्रुवारीच्या ३२ लकी बॉय तर २३ लकी गर्लचे स्वागत

२९ फेब्रुवारीच्या ३२ लकी बॉय तर २३ लकी गर्लचे स्वागत

Next
ठळक मुद्देलीप ईयर । ५५ पैकी ४३ प्रसुती झाल्या नैसर्गिक

बीड : इंग्रजी वर्षानुसार दर चार वर्षांनी येणाऱ्या लीप वर्षाची चर्चा होत असते. या वर्षातील फेब्रुवारी महिन्यात २९ दिवस असतात. या तारखेला जन्म घेणारे भाग्यवान चार वर्षांची कसर काढून धुमधडाक्यात वाढदिवस साजरा करतात. यंदाही २०२० मधील २९ फेब्रुवारीच्या लकी बॉय आणि लकी गर्लबद्दल आकर्षण होते. जिल्ह्यात ५५ प्रसुती झाल्या. ३२ मुलांनी तर २३ मुलींनी जन्म घेतला.
आज जन्मलेल्या बाळांचा वाढदिवस इंग्रजी वर्षानुसार चार वर्षांनी येतो. त्याची वाट न पाहता मराठी तिथीनुसारच दरवर्षी बाळाचा वाढदिवस आनंदाने साजरा करण्यास काही हरकत नाही असे मत येथील स्त्री रोग तज्ज्ञ व सामाजिक कार्यकर्त्या डॉ.शालिनी कराड यांनी व्यक्त केले आहे.
बीड जिल्हा रुग्णालयात १२ प्रसुती झाल्या. ८ मुले तर ४ मुलींचा जन्म झाला. परळीच्या उपजिल्हा रु ग्णालयात आठ प्रसुती झाल्या. यात ६ मुलांनी तर २ मुलींनी जन्म घेतला. केज उपजिल्हा रु ग्णालयात आज एकूण चार महिलांचे बाळंतपण झाले. यात तीन मुली व एका मुलाचा जन्म झाल्याचे डॉ. दत्तात्रय चाळक यांनी सांगितले. अंबाजोगाईत १७ प्रसुती झाल्या. यात ८ मुले व ९ मुलींनी नवे जग पाहिले. गेवराईत ६ मुले जन्माला आली. यात ३ मुले व ३ मुलींचा समावेश आहे. आष्टीत तीन प्रसुती झाल्या. तिन्ही मातांनी मुलींना जन्म दिला. माजलगावात एकमेव मुलाने जन्म घेतला. मात्र वडवणी आणि शिरुर कासारमध्ये एकही प्रसुती झाली नसल्याचे आमच्या वार्ताहरांनी कळविले आहे.
१२ सीझर
२९ फेब्रुवारी रोजी ५५ प्रसुतींपैकी १२ प्रसुती शस्त्रक्रियेने झाल्या. बीडमध्ये ३, केजमध्ये २, अंबाजोगाईत ६ तर आष्टीत १ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
धारुरची कन्या भाग्यवान
धारूर ग्रामीण रुग्णालयात माजलगाव तालुक्यात माहेर व पाथरी तालुक्यात सासर असलेल्या सारिका विनायक काळे हिने कन्यारत्नाला जन्म दिला. या बाळाचे वजन अडीच किलो असल्याचे अधीक्षक डॉ. चेतन आदमाने यांनी सांगितले. कुटुंबाने लेकीच्या जन्माचे स्वागत केले.
आष्टीत ३ मुली तर पाटोद्यात ३ मुले
आष्टीत तीन मुलींचा जन्म झाल्याचे वैद्यकीय अधीक्षक राहुल टेकाडे यांनी सांगितले. तर पाटोद्यात तीन मुलांनी जन्म घेतल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सूर्यकांत सावंत यांनी सांगितले. तर गेवराईत तीन मुले व तीन मुलींनी जन्म घेत समान आकडा गाठल्याचे वै. अधीक्षक डॉ. राजेश शिंदे यांनी सांगितले.

Web Title: Welcome to 1 Lucky Boy and 1 Lucky Girl on February 19th

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.