रुग्णांच्या सेवेसाठी प्रसंगी आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 04:31 IST2021-05-24T04:31:33+5:302021-05-24T04:31:33+5:30

धनंजय मुंडे : कितीही भयंकर परिस्थिती आली तरी बीड जिल्हा सक्षम असेल आष्टी : दुसरी लाट रोखण्यास बीड ...

We will keep a basil leaf on our house on occasion for patient service | रुग्णांच्या सेवेसाठी प्रसंगी आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवू

रुग्णांच्या सेवेसाठी प्रसंगी आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवू

धनंजय मुंडे : कितीही भयंकर परिस्थिती आली तरी बीड जिल्हा सक्षम असेल

आष्टी : दुसरी लाट रोखण्यास बीड जिल्ह्याला यश आले असून, कितीही मोठी आपत्ती आली तरी आरोग्य सुविधा देण्यात कमी पडणार नाही. बीड जिल्हा सक्षम असेल. रुग्णांच्या सेवेसाठी प्रसंगी आमच्या घरावर तुळशीपत्र ठेवू, असे प्रतिपादन पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले.

येथील ॲड. बी. डी. हंबर्डे महाविद्यालयात ५० बेडच्या आधार कोविड केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ. रोहित पवार, आमदार संदीप क्षीरसागर, आ. बाळासाहेब आजबे, आ. यशवंत माने, माजी आ. साहेबराव दरेकर, माजी आ. अमरसिंह पंडित, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बजरंग सोनवणे, युवा प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, रामकृष्ण बागर, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष शिवाजी राऊत, जि‌‌ल्हा परिषद सदस्य सतीश शिंदे, भाऊसाहेब लटपटे आदी उपस्थित होते.

यावेळी मुंडे म्हणाले, यापुढे जिल्हाभरात लागणाऱ्या ऑक्सिजनची निर्मिती जिल्ह्यात केली जाणार असून, यापुढील १ महिन्यात बाहेरून ऑक्सिजन मागवण्याची गरज भासणार नाही. कोरोना बाधित रुग्णांचे हाल होऊ नयेत, त्यांना वेळेत उपचार मिळावेत, म्हणून ३००० ऑक्सिजन बेड उपलब्ध केले होते. दुसऱ्या लाटेत येणाऱ्या तिसऱ्या लाटेत कोणीही बळी होऊ नये, यासाठी खबरदारी घेत आहोत. कोविड काळात रुग्णांची सेवा करणारे आरोग्य कर्मचारी, पोलीस प्रशासन, नागरिकांचे त्यांनी धन्यवाद मानले. आ. रोहित पवार यांनी सहकार्याचे आश्वासन दिले. यावेळी किशोर हंबर्डे, शिरीष थोरवे, परमेश्वर शेळके, मनोज चौधरी, अण्णासाहेब चौधरी, दिगांबर पोकळे, बाबासाहेब वाघुले, सरपंच अशोक पोकळे, नाजिम शेख आदी उपस्थित होते.

Web Title: We will keep a basil leaf on our house on occasion for patient service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.