शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितचा स्वभाव मला माहीत आहे, तो कधीही...; निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पवारांचं मोठं वक्तव्य
2
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
3
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
4
"पाकिस्तानात निघून जा अन् तिथे मुस्लिमांना आरक्षण द्या"; CM सरमा यांचा लालू यादवांवर निशाणा
5
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
6
आधी पाया पडते, पदर पसरते म्हणणारे आता गुरगुरत आहेत; जरांगेंची मुंडे बहीण-भावावर टिका
7
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
8
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
9
Smriti Irani : "अमेठीत पोलिंग बूथ कॅप्चर करणारे एका सामान्य कार्यकर्तीकडून हरले..."; स्मृती इराणींचा घणाघात
10
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
11
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
12
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
13
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती
14
...तर २८८ जागा लढवणार, ७ ते ८ उपमुख्यमंत्री करणार; मनोज जरांगे पाटलांचा फॉर्म्युला ठरला
15
'राजा हिंदुस्तानी'साठी करिश्मा कपूर नाही तर ऐश्वर्या राय होती पहिली पसंती, या कारणामुळे अभिनेत्रीने नाकारला सिनेमा
16
१५,२०,२५ आणि ३० वर्षांसाठी घ्यायचंय ३० लाखांचं Home Loan, किती द्यावा लागेल EMI, किती व्याज?
17
सिंचन घोटाळ्याबाबत आम्ही अजित पवारांवर आरोप केले, कारण...; फडणवीस पहिल्यांदाच स्पष्टपणे बोलले!
18
MI च्या शेवटच्या सामन्यानंतर कोच बाऊचर यांचा प्रश्न, पुढे काय? रोहित शर्मानं स्पष्ट सांगितलं
19
सोमवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार की नाही; BSE-NSE बंद राहणार का? जाणून घ्या
20
मोठी बातमी! MI च्या खराब कामगिरीनंतर सूत्र हलली; BCCI चा फैसला, रोहितलाही फटका

७ राज्यांतील ‘वॉन्टेड’ गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2019 12:20 AM

सात राज्यांत गुन्हेगारी करून सहा वर्षांपासून फरार असलेला वॉन्टेड गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे.

ठळक मुद्देसहा वर्षांपासून होता फरार : पोलिसांना गुंगारा देत करायचा गुन्हेगारी

लोकमत न्यूज नेटवर्कबीड/परळी : सात राज्यांत गुन्हेगारी करून सहा वर्षांपासून फरार असलेला वॉन्टेड गुन्हेगार बीड पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. रविवारी दुपारी त्याच्या परळी शहरातील इराणी गल्लीत विशेष आॅपरेशन राबवून मुसक्या आवळण्यात आल्या. पोलिसांना गुंगारा देत तो गुन्हेगारी करीत असे. अखेर त्याला बेड्या ठोकण्यात बीड पोलिसांना यश आले.जहीर अब्बास शेकू अली (३२ रा.इराणी कॉलनी शिवाजीनगर, परळी) असे या कुख्यात गुन्हेगाराचे नाव आहे. जहीरबरोबरच त्याचा लहान भाऊ लाला यालाही बेड्या ठोकल्या आहेत. महाराष्ट्रासह आंध्रप्रदेश, गुजरात, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश व दिल्ली येथे त्याने अनेक गुन्हे केले होते. मारामारी, लुटमार, धमकावणे, फसवणूक, लुबाडणे, चैन स्नॅचिंग, मारामारी करणे असे अनेक गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या सातही राज्यातील पोलिसांना जहीर हवा होता. रविवारी तो परळीत आल्याची माहिती मिळाली. अपर पोलीस अधीक्षक अजित बोºहाडे यांनी यासाठी विशेष कोम्बिंग आॅपरेशन राबविण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे इराणी कॉलनीत फौजफाट्यासह सापळा लावला.पोलीस आल्याचे समजताच जहीर मागच्या गल्लीतून पळाला. मात्र पोलिसांच्या नजरेतून सुटला नाही. सपोनि श्रीकांत डोंगरे व पथकाने अर्धा किमी पाठलाग करून त्याला पकडले. त्यानंतर त्याला परळी ठाण्यात बंदोबस्तात आणण्यात आले.ही कारवाई पोलीस अधीक्षक जी.श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोºहाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि बाळासाहेब पाटील, सपोनि श्रीकांत डोंगरे, सलीम पठाण, रमेश सिरसाठ, मधुकर निर्मळ, व्यंकट भताने, रंगा राठोड, सविता दहीवाळ, दत्ता गित्ते, लाला बडे, सचिन सानप, गोविंद फड, अडेकर, मुंडे, भांगे आदींनी केली.पोलिसांना पाहून महिलांचा आरडाओरडा४परळीतील इराणी गल्लीत चार दोन पोलिसांनी जाणे अशक्य आहे. येथे ‘एन्ट्री’ करताना मोठा फौजफाटा सोबत घ्यावा लागतो. रविवारीही जहीरला पकडण्यासाठी पोलीस गल्लीत गेल्यावर महिलांनी त्यांना गराडा घालत आरडाओरडा सुरू केला. हे ऐकून जहीर पळू लागला. मात्र, पोलिसांनी त्याला पाठलाग करून पकडले.ठकबाजी करण्यात तरबेज४तोतया पोलीस, दागिने उजळून देणे, हातचालाकी करून दागिने व पैसे लंपास करण्यात जहीर तरबेज होता. त्याने असे अनेक गुन्हे केलेले आहेत. त्याच्याकडून राज्यातील ठकबाजीची अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :BeedबीडBeed policeबीड पोलीसCrime Newsगुन्हेगारी