Wanjari community will also take to the streets for reservation | आरक्षणासाठी वंजारी समाजही उतरणार रस्त्यावर
आरक्षणासाठी वंजारी समाजही उतरणार रस्त्यावर

ठळक मुद्दे२८ आॅगस्टला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

बीड : वाढीव आरक्षण देण्याच्या मागणीसाठी आता वंजारी समाजही रस्त्यावर उतरणार आहे. २८ आॅगस्ट रोजी बीडमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे. वंजारी आरक्षण कृती समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत शनिवारी ही माहिती देण्यात आली.
वंजारी समाजाला २ वरून १० टक्के वाढीव आरक्षण द्यावे, जातनिहाय जनगणना करावी, जिल्हास्तरावर वंजारी समाजाच्या मुलांसाठी शासकीय वसतीगृह उभारावे, सुशिक्षित बेरोजगारांना बिनव्याजी कर्ज द्यावे, समाजाच्या विकासासाठी कै.गोपिनाथ मुंडे या नावाने महामंडळ स्थापन करावे, मागासवर्गीय प्रवर्गातून उच्चतम गुणवत्ताधारक स्पर्धकांना खुला प्रवर्गामध्ये सर्वस्तरावील शिक्षणाची व नौकरीची संधी पूर्ववत मिळावी, यासारख्या मागण्यांना घेऊन वंजारी समाज रस्त्यावर उतरणार आहे. २८ आॅगस्ट रोजी सकाळी ११ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरूवात होऊन तो जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे.
या मोर्चात सर्वात पुढे विद्यार्थी, त्यामागे महिला, तरूणी, विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी सर्वसामान्य नागरिक आणि सर्वात शेवटी राजकीय, सामाजिक संघटना राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले. या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन कृती समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

Web Title: Wanjari community will also take to the streets for reservation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.