शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

वाल्मीक कराडला सात दिवस कोठडी, बीड न्यायालयाबाहेर राडा; परळी दुसऱ्या दिवशीही बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2025 06:22 IST

सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते.

बीड : वाल्मीक कराड याच्यावर मकोका लावल्यानंतर त्याला बुधवारी बीड न्यायालयात हजर केले. त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. खोटे गुन्हे मागे घ्यावे, यासाठी परळीत दुसऱ्या दिवशीही बंद पाळण्यात आला. अनेक समर्थक टॉवरवर चढून आंदोलनही केले.न्या. सुरेखा पाटील यांच्यासमोर दुपारी सुनावणी सुरू झाली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड. बाळासाहेब कोल्हे, तर कराडच्या वतीने ॲड. सिद्धेश्वर ठोंबरे यांनी युक्तिवाद केला. ॲड. ठोंबरे हे छत्रपती संभाजीनगरहून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे जोडले होते.

ॲड. कोल्हे यांनी या गुन्ह्यात कराडचा कसा सहभाग आहे, फरार आरोपी कृष्णा आंधळेसोबत काय कनेक्शन, सीडीआर तपासायचे आहेत, अशा प्रकारचे १० मुद्दे मांडून १० दिवसांची काेठडी मागितली. तर, कराडचे वकील ॲड. ठोंबरे यांनी या हत्येच्या गुन्ह्यात कराडचा संबंध नाही. अगोदरच १५ दिवस कोठडी घेतलेली. आता परत त्याच प्रश्नांवर काेठडीची गरज नाही. त्यामुळे न्यायालयीन कोठडी मागितली. न्या. पाटील यांनी दोन्ही युक्तिवाद ऐकून घेतल्यावर २२ जानेवारीपर्यंत कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.

बीड-परभणी प्रकरणाची न्यायालयीन चौकशीबीड येथील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण व परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणांची न्यायालयीन चौकशी करण्याची घोषणा राज्य सरकारने केली. देशमुख हत्या प्रकरणाची चौकशी सेवानिवृत्त न्यायाधीश एम. एल. ताहलियानी यांच्या एकसदस्यीय चौकशी समितीमार्फत होईल. तर सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणाची चौकशी करण्यासाठी सेवानिवृत्त न्यायाधीश व्ही. एल. आचलिया यांची एक सदस्यीय समिती नेमण्यात आली. या दोन्ही समितींना कोणाही व्यक्तीला चौकशीसाठी बोलावण्याचे अधिकार असतील. न्या. आचलिया समिती परभणीत घडलेला हिंसाचाराचीही चौकशी करणार आहे.

मागच्या दाराने नेलेबीड न्यायालयाबाहेर कराड समर्थकांनी मोठी गर्दी केली होती. हे पाहून पोलिसांनी समोर बंदोबस्त लावला, तर न्यायालयाच्या मागील दाराने कराडला तिसऱ्या मजल्यावरील मकोका न्यायालयात नेले. त्यानंतर पुन्हा त्याच मार्गाने खाली आणून पोलिस व्हॅनमधून बीड शहर ठाण्याच्या कोठडीत नेले.

वकिलाची घोषणाबाजी कराड याला न्यायालयातून बाहेर नेत असताना, ॲड. हेमा पिंपळे यांच्यासह इतर महिलांनी घोषणाबाजी करत कराडला फाशी देण्याची मागणी केली. यानंतर कराड समर्थकही आक्रमक झाले.  अनेक समर्थकांना पोलिसांनी ताब्यात घेतले.

टॅग्स :walmik karadवाल्मीक कराडbeed sarpanch murder caseबीड सरपंच हत्या प्रकरणBeedबीड