उक्कडपिंप्रीत दोन गटांत तुंबळ हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 1, 2021 04:32 IST2021-05-01T04:32:44+5:302021-05-01T04:32:44+5:30

गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील दत्तात्रय बाबूराव बांगर, सविता दत्तात्रय बांगर, गोकुळ अर्जुन बडे, राणी गोकुळ बडे यांच्यावर बीड शहरातील ...

Violent fighting between two groups in Ukkadpimprit | उक्कडपिंप्रीत दोन गटांत तुंबळ हाणामारी

उक्कडपिंप्रीत दोन गटांत तुंबळ हाणामारी

गेवराई तालुक्यातील उक्कडपिंप्री येथील दत्तात्रय बाबूराव बांगर, सविता दत्तात्रय बांगर, गोकुळ अर्जुन बडे, राणी गोकुळ बडे यांच्यावर बीड शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुरुवारी रात्री उक्कडपिंप्री येथील सरपंचाच्या गटातील काही लोकांनी गोकुळ अर्जुन बडे यांच्या घरी येऊन जुन्या वादातून त्यांना मारहाण केली. या मारहाणीत गोकुळ बडे गंभीर जखमी झाले, तर दत्तात्रय बांगर, सविता बांगर यांना देखील मारहाण करण्यात आली. जखमींवर उपचार सुरू असून सायंकाळी उशिरा पोलिसांत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. विष्णू साहेबराव बांगर यांना का बोलतात, ते आमचे विरोधक आहेत, असे म्हणत सरपंचाच्या गटाने त्यांना मारहाण केल्याचे सांगितले जाते. दरम्यान, याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

Web Title: Violent fighting between two groups in Ukkadpimprit