भाजपाच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2019 23:44 IST2019-03-28T23:44:07+5:302019-03-28T23:44:14+5:30
शहरातील भाजपाचे नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर १५ मधील भाजीमार्केटच्या जागेवरील वादातून बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.

भाजपाच्या नगरसेवकावर विनयभंगाचा गुन्हा
पनवेल : शहरातील भाजपाचे नगरसेवक नीलेश बाविस्कर यांच्यावर खारघर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सेक्टर १५ मधील भाजीमार्केटच्या जागेवरील वादातून बुधवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.
भाजीमार्केटच्या जागेवर कोपरा गावातील मयेकर कुटुंबीयांनी दावा केला आहे. या वादातून झालेल्या भांडणात बाविस्कर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी बाविस्कर यांच्या तक्रारीवरून मयेकर कुटुंबीयांच्या सदस्यांवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित प्रकारा वेळी पोलीस प्रत्यक्ष हजर होते, त्यामुळे खरी बाजू समोर येईल, अशी प्रतिक्रिया नीलेश बाविस्कर यांनी दिली.