शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे सुपुत्र बी. आर. गवई देशाचे नवे सरन्यायाधीश; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंनी दिली शपथ
2
भाजपा मंत्र्याच्या नेमप्लेटवर शाई, काँग्रेसची निदर्शनं; कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबाबत वादग्रस्त विधान भोवलं
3
Video: भारत-पाकिस्तान शस्त्रसंधीचे श्रेय घेणारा अमेरिका दहशतवादाच्या प्रश्नावर गप्प...
4
सरन्यायाधीशांना मिळतो पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार; सोबत भत्ते आणि मिळतात 'या' खास सुविधा
5
कर्नल सोफिया कुरेशींबाबत आक्षेपार्ह विधान करणाऱ्या भाजपा मंत्र्याला दणका; वरिष्ठांचे आदेश आले, अन्...
6
रितेश देशमुखनं विचारलं 'मोठं होऊन काय होणार?' लहानग्याचं उत्तर ऐकून तुम्हालाही वाटेल अभिमान!
7
बर्फ वितळेल, जास्त पाऊस पडेल, गंगा नदीचा प्रवाह ५० टक्क्यांनी वाढेल..; IIT रुरकीचा रिपोर्ट
8
विराटशिवाय 'टेस्ट' झाली फिकी; प्रीती झिंटानं बोलून दाखवली मनातली गोष्ट
9
पाकिस्ताननं जितक्या रकमेसाठी IMF मध्ये नाक कापून घेतलं, भारताला त्यापेक्षा अधिक तर 'गिफ्ट'च मिळणारे; प्रकरण काय?
10
अनुष्का सेनवर चिडला नील नितीन मुकेश? आगामी सीरिजच्या प्रमोशनल इव्हेंटमधील व्हिडिओ व्हायरल
11
एकामागोमाग एक दिग्गज कंपन्या निर्णय घेतायत; मायक्रोसॉफ्ट ६००० कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार
12
Rohit Sharma : कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर रोहित शर्मा मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला, कारण काय ?
13
ब्रेकअपनंतर प्रेयसीचे ’तसले’ व्हिडीओ पॉर्न साईटवर? कोल्हापूरच्या प्रियकरावर पुण्यात गुन्हा
14
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आता बुलेटप्रुफ कारमधून ये-जा करणार; पाकिस्तानमुळे वाढली सुरक्षा
15
मोठी बातमी! अकोल्यातील पाच सराफा दुकानांवर आयकरची धाड; सकाळपासून शोधमोहिम सुरू
16
पाकिस्तानला शस्त्रास्त्रे देणाऱ्या तुर्कीवर पुण्यातून ट्रेड स्ट्राईक; उदयपूरचे संगमरवर व्यापारीही माल आणणार नाहीत
17
कोण आहे कशिश चौधरी?; वयाच्या २५ व्या वर्षी या हिंदू मुलीनं पाकिस्तानात रचला इतिहास
18
भारत-पाकिस्तान तणावामुळे आलिया भटने घेतला हा मोठा निर्णय, वाचून कराल तिचं कौतुक
19
हेअर ट्रान्सप्लांटमुळे एक नव्हे २ इंजिनिअरचा मृत्यू; डॉ. अनुष्का तिवारीचा नवा कांड उघड
20
Stock Market Today: या वृत्तानं बदलला बाजाराचा मूड; १३० अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स, IT-Metal स्टॉक्समध्ये तेजी

पाण्यासाठी भटकंतीकरून गावकरी थकले, गोदापात्रात जलसमाधीसाठी मुख्यमंत्र्यांकडे मागितली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 16:53 IST

seek permission from CM for Jalasamadhi गावातील महिला, लेकराबाळ, आबाल वृद्धांना रणरणत्या उन्हात गोदावरी नदीपात्रातून पाणी आणावे लागत आहे.

ठळक मुद्दे थकीतबिलामुळे महावितरणने सार्वजनिक बोरचे विद्युत कनेक्शन तोडले आहे.

माजलगाव : मोगऱ्यात महावितरण कंपनीने थकीबाकीच्या नावाखाली सार्वजनिक बोरची वीज तोडली. ग्रामपंचायतची थकबाकी भरण्याची ऐपत नाही. यामुळे गावातील महिला, लेकराबाळ, आबाल वृद्धांना रणरणत्या उन्हात गोदावरी नदीपात्रातून पाणी आणावे लागत आहे. याकडे प्रशासनाने दुर्लक्ष होत असल्याने भटकंती करून थकलेल्या ग्रामस्थांनी मुख्यमंत्र्याकडे गोदावारीपात्रात जलसमाधीला घेण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी तहसिलदारांमार्फत केली आहे.

कोरोना, गारपीट व अवकाळीच्या हातात हात घालून महावितरण आल्याने मोगरा वासीयांवर संकटांची मालिकाच कोसळली आहे. थकीतबिलामुळे महावितरणने सार्वजनिक बोरचे विद्युत कनेक्शन तोडले आहे. गावाची लोकसंख्या 5 हजार असूनही इथे पाणीपुरवठा योजना नाही. जुने हातपंप नादुरुस्त आहेत. तर एकास दुषित पाणी येते. यामुळे गावकऱ्यांना पिण्याचे पाणी आणण्यासाठी 17 किमी दूर असलेल्या माजलगावला जावे लागत आहे. याला कंटाळून पाच दिवसांपूर्वी गावातील महिलांनी पाण्यासाठी रणरणत्या उन्हात ग्रामपंचायत समोर आंदोलन केले. ग्रामसेवक बजरंग राठोड यांनी लेखी आश्वासन देऊन सायंकाळी 5 वाजेपर्यंत बोर सुरू करतो असे सांगितले. परंतु, आंदोलन होऊन पाच दिवस झाले तरीही ग्रामसेवक गावात आलेला नाही. तर गावातील महावितरण कर्मचाऱ्याचे वागणे संशयास्पद असून संपूर्ण गावाची वीज तोडली असताना काही ठिकाणी आकडे टाकून  विज सुरू असल्याचे दिसून आले. 

भटकंती करून कंटाळलेल्या ग्रामस्थांनी ग्रामपंचायतने पाणी द्यावे अन्यथा प्रशासनाने गोदावरीत जलसमाधीस परवानगी तरी दयावी अशी मागणी केली आहे.  गावकऱ्यांनी तसे पत्र तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे. यावेळी पवन मोगरेकर, विकास झेटे, दत्ता महाजन यांची उपस्थिती होती.

टॅग्स :WaterपाणीBeedबीड