वृक्षारोपणाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे उपोषण

By Admin | Updated: July 22, 2014 00:14 IST2014-07-22T00:08:38+5:302014-07-22T00:14:27+5:30

गेवराई : तालुक्यातील सिंदखेड येथे सामाजिक वनीकरणच्या वतीने १७ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते.

Villagers fasting to inquire about plantation | वृक्षारोपणाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे उपोषण

वृक्षारोपणाच्या चौकशीसाठी ग्रामस्थांचे उपोषण

गेवराई : तालुक्यातील सिंदखेड येथे सामाजिक वनीकरणच्या वतीने १७ हजार झाडे लावण्याचे उद्दिष्ट होते. यासह गावातील विविध कामात गैरप्रकार झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी करीत चौकशीसाठी सोमवारी तहसील समोर उपोषण केले.
सिंदखेड येथे वन विभागाच्या वतीने थातूरमातूर खड्डे खोदून वृक्षारोपण करण्यात आले. या कामात केवळ कागदी घोडे नाचविल्याने ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. तसेच येथील व्यायामशाळा, वाचनालय, स्मशानभूमी बांधकाम व बांधबंदीस्ती यासह गावच्या विकासासाठी आलेला निधी खर्च न करता अनुदान लाटल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. याची चौकशी करण्याचे निवेदन दिले होते. यावर कारवाई न झाल्याने ग्रामस्थांनी सोमवारपासून उपोषण सुरू केले. यावेळी सिंदखेड येथील अप्पासाहेब ठोसर, दत्तात्रय ठोसर, बाळासाहेब करांडे, श्रावण ठोसर, तुळशीदास ंिपंपळकर, भैय्या ठोसर, नितीन ठोसर, बप्पासाहेब ठोसर, विकास ठोसर, भागवत ठोसर, योगेश ठोसर यांच्यासह ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत. (वार्ताहर)

Web Title: Villagers fasting to inquire about plantation