बुट्टेनाथ दरीत गावठी दारू अड्डा उद‌्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 04:18 IST2020-12-28T04:18:05+5:302020-12-28T04:18:05+5:30

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त अंबाजोगाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई ...

Village liquor den destroyed in Buttenath valley | बुट्टेनाथ दरीत गावठी दारू अड्डा उद‌्ध्वस्त

बुट्टेनाथ दरीत गावठी दारू अड्डा उद‌्ध्वस्त

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई : १ लाख १४ हजारांचा मुद्देमाल जप्त

अंबाजोगाई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अंबाजोगाई येथील निरीक्षकांच्या पथकाने शहरालगत असणाऱ्या बुट्टेनाथ दरी परिसरातील गावठी दारू अड्डा उद‌्ध्वस्त केला. रविवारी सकाळी धाड टाकून केलेल्या कारवाईत १ लाख १४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त करून एकूण चार गुन्हे दाखल केले.

सध्या ग्रामपंचायत निवडणूक निमित्त आदर्श आचारसंहिता सुरू आहे . तसेच ३१ डिसेंबर ही वर्षपूर्ती व नववर्षाचे स्वागत या पार्श्वभूमीवर कारवाया सुरू आहेत. अवैधरित्या गावठी मद्यनिर्मिती होत असल्याची माहिती प्राप्त होताच उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने बुट्टेनाथ दरी व परिसरात गस्तीवर असताना केलेल्या कारवाईत एकूण चार गुन्हे नोंदवले आहेत.या कारवाईत ४६०० लिटर रसायन,२०० लिटरचे २३ बॅरल,२ टोपली असा एकूण १ लाख १४ हजार रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. तिशय दुर्गम ठिकाणी केलेल्या कारवाईत राज्य उत्पादन शुल्क,अंबाजोगाई विभागाचे प्रभारी निरीक्षक ए.आर.गायकवाड,दुय्यम निरीक्षक ए.एन.पिकले,जवान बी.के.पाटील,जवान तसेच वाहनचालक के.एन.डुकरे यांनी सहभाग घेतला.

Web Title: Village liquor den destroyed in Buttenath valley