शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानला जे करायचं होते ते केलेच, पाक सैन्याची मोठी घोषणा; भारताचं टेन्शन का वाढणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: महिला आरक्षण विधेयक देशाची दिशा अन् दशा ठरवणारे - पंतप्रधान नरेंद्र मोदी
3
महिला आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया; भूमिका स्पष्ट करत म्हणाले, “तत्काळ…”
4
तेलाच्या किंमती घसरणार? इराणने स्वतःच काढला तोडगा; पाहा होर्मुजमधून जहाजं कशी सुटणार?
5
"सपाने सर्व तिकिटे मुस्लिमांना द्यावीत, हरकत नाही...!" 'मुस्लीम आरक्षणा'वर अमित शाह रोखठोक बोलले, संसदेत नेमकं काय घडलं?
6
TCS Salary Hike 2026 : TCS कर्मचाऱ्यांची चांदी! कुणाचीही नोकरी जाणार नाही; कंपनीकडून पगारातही मोठी वाढ जाहीर
7
POK मधील २४ जागांमध्ये पुनर्रचना विधेयकामुळे काही बदल होणार का? केंद्र सरकारची योजना काय?
8
‘तुम्ही काळे झेंडे दाखवा, अथवा पिवळे, सभागृहाला काय…’ लोकसभा अध्यक्षांचा टोला
9
दहशतवादी हाफिज सईदचा राईट हॅण्ड अमीर हमजाला घातल्या गोळ्या, लाहोरमध्ये अज्ञाताकडून हल्ला
10
एका दिवसात ₹२३० चा शेअर झाला ₹१,८४० चा; बंद होण्याच्या मार्गावर असलेल्या कंपनीचं नशीब कसं पालटलं?
11
IPL 2026: दुष्काळात तेरावा महिना! चेन्नई सुपरकिंग्जचा स्टार गोलंदाज आयपीएल २०२६ मधून बाहेर
12
रशियन-इराणी कच्च्या तेलावरील सूट संपली! होर्मुझमध्ये नाकेबंदी; अमेरिकेच्या पावलानं भारतावर काय परिणाम होणार?
13
दोन शेजारी, एक बॉयफ्रेंड अन् सुडाचा प्रवास! लग्नाच्या ४ दिवस आधी नवरीचा चेहरा विद्रुप, वाचा थरार
14
TCS HR हेडची किती होती सॅलरी, निदा खानच्या बँक खात्यात आणखी कुठून यायचा पैसा?; तपासाला नवं वळण
15
रशियाची भारताला साथ! "काहीही झाले तरी भारताला तेल अन् LPG देतच राहणार"; रशियाची 'तगडी ऑफर'
16
Video: महिलेने बाल्कनीतून हवेत उडवले दीड कोटी रुपये; नोटा जमा करायला लोकांची उडाली झुंबड
17
Nida Khan : HR निदा खानच्या WhatsApp चॅटमधून उलगडणार मोठं रहस्य; कसं व्हायचं कर्मचाऱ्यांचं ब्रेनवॉशिंग?
18
बागेश्वर धाम धीरेंद्र शास्त्री आता थेट परदेशातून देणगी घेऊ शकणार; सरकारने दिली मोठी परवानगी
19
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
20
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष संघटना बांधणीसाठी विजयसिंह पंडितांनी घातले लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:23 IST

गेवराई : केवळ निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत लागते, असे नाही तर समाजकारण करतानासुध्दा पक्ष संघटनेची आवश्यकता भासते. कोरोनाच्या कठीण ...

गेवराई : केवळ निवडणुकीसाठी पक्ष संघटना मजबूत लागते, असे नाही तर समाजकारण करतानासुध्दा पक्ष संघटनेची आवश्यकता भासते. कोरोनाच्या कठीण संक्रमण काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केलेले काम उल्लेखनीय आहे. पक्ष संघटना मजबूत करताना स्वतःची काळजी घ्या, स्वतःसह इतरांचेही लसीकरण करून घेण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विजयसिंह पंडित यांनी केले.

गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसची त्यांनी आढावा बैठक घेतली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी विजयसिंह पंडित यांनी लक्ष घातल्याचे चित्र गेवराई मतदार संघात दिसत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा मराठवाड्यात सुरू आहे. बीड जिल्ह्यातील यात्रेचा प्रस्तावित दौरा रद्द झाला असला तरीही विजयसिंह पंडित यांनी यानिमित्ताने गेवराई विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या विविध सेल व फ्रंटचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांच्याशी आढावा बैठकीच्या माध्यमातून संवाद साधला.

यावेळी व्यासपीठावर भाऊसाहेब नाटकर, बाबुराव जाधव, जगन पाटील काळे, जगन्नाथ शिंदे, कुमार ढाकणे, फुलचंद बोरकर, जालिंदर पिसाळ, सुनील पाटील, अब्दुल हन्नान, मोनिका खरात, विलास सोनवणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब नाटकर यांनी आपल्या प्रास्ताविकपर भाषणात बैठक आयोजनामागची भूमिका स्पष्ट केली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रा आपल्या तालुक्यात येणार असून, त्यादृष्टीने सर्वांनी शिस्तबध्द नियोजन केले पाहिजे, असे सांगून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर सर्वांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात सुनील पाटील, फुलचंद बोरकर, गजानन काळे, भाऊसाहेब माखले, राजेंद्र बरकसे, अ‍ॅड. स्वप्नील येवले आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादी जिल्हा युवकचे उपाध्यक्ष शेख सलीम यांनी मान्यवरांच्या उपस्थितीत कार्य अहवाल सादर केला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधीर गाडे यांनी केले, तर मोनिका खरात यांनी आभार मानले.

010721\01bed_6_01072021_14.jpg