शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO : परळीत शरद पवार गटाच्या नेत्याला मुंडे समर्थकांची मारहाण; राष्ट्रवादीकडून निषेध...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 17:13 IST

परळी मतदारसंघात अजित पवार गटाच्या धनंजय मुंडेंविरोधात शरद पवार गटाचे राजेसाेब देशमुख रिंगणात आहेत.

Parli NCP vs NCP : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आज राज्यभरात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. मतदानामुळे सर्वत्र पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त आहे, पण अशातही अनेक ठिकाणी मारहाण अन् मतदान प्रक्रियेत अडथळा निर्माण केल्याच्या घटना घडत आहेत. बीड जिल्ह्यातील हायव्होल्टेज अशा परळी मतदारसंघात अशाच प्रकारच्या घटना घडल्या आहेत.

परळी मतदारसंघातील एका मतदान केंद्राबाहेर धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने शरद पवार गटाच्या नेत्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाने हा व्हिडीओ एक्सवर या घटनेचा व्हिडिओही शेअर केला आहे. यासह दावा केला आहे की, मारहाण करणारे लोक भाजप आणि धनंजय मुंडेंचे समर्थक आहेत. 

शरद पवार गटाने व्हिडीओ शेअर करत म्हटले की, लोकशाहीच्या उत्सवात ठोकशाहीने मतांची बेगमी करणाऱ्या धनंजय मुंडे गटाच्या गुंडांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे युवक प्रदेश सरचिटणीस माधव जाधव यांना मारहाण केली. ही घटना निंदनीय आहेच पण राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचे द्योतक सुद्धा आहे. अशा घटनांचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष जाहीर निषेध करतो!

शरद पवारांच्या पक्षाचे बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांनीदेखील या घटनेचा व्हिडीओ शेअर केला आहे. यासह सोनावणे यांनी म्हटले की, आमचे सहकारी ॲड. माधव जाधव यांना परळी मतदारसंघातील बुथ बाहेर विरोधी पक्षाच्या गुंडानी बेदम मारहाण केली. अशा दहशत पसरवणाऱ्या वृत्तीचा जाहीर निषेध. 

परळीत नेमकं काय घडलं?येथील बँक कॉलनीतील मतदान केंद्राबाहेर थांबलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कार्यकर्ते ॲड. माधव जाधव यांना बुधवारी 12 च्या सुमारास तेथील मुंडे समर्थक चार-पाच युवक कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केल्याचा प्रकार  घडला आहे. तसेच यावेळी त्यांच्यासोबत असलेले बाबा शिंदे यांनाही धक्काबुक्की करण्यात आली व परंतु या प्रकरणी दुपारी चार वाजेपर्यंत जाधव यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली नव्हती.     

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४parli-acपरळीDhananjay Mundeधनंजय मुंडेSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेस